Saturday, March 22, 2025
Homeताज्या घडामोडीFake website : नामांकित कंपन्यांची क्लोन वेबसाईट, गेमिंग, क्रिप्टो वॉलटेच्या फेक वेबसाईटच्या...

Fake website : नामांकित कंपन्यांची क्लोन वेबसाईट, गेमिंग, क्रिप्टो वॉलटेच्या फेक वेबसाईटच्या माध्यमातून लाखोंची फसवणूक

पनवेल सायबर सेल (पीसीसी) विभागाने केली फेक वेबसाईट कंपनी संचालकांना अटक

विशाल सावंत
पनवेल : सायबर गुन्ह्याकरीता नामांकित कंपन्यांच्या, गेमिंगच्या, क्रिप्टो वॉलेटच्या फेक वेबसाईट (Fake website) व फेक अ‍ॅप बनवून देणार्‍या तामिळनाडू स्थित कंपनीच्या संचालक आरोपीस पनवेल सायबर सेल (पीसीसी) ने अटक केली आहे.

या संदर्भात हॉटेल्सना ऑनलाईन रेटिंग देण्याच्या टास्कमधून चांगली कमाई देण्याचे आमिष दाखवून फिर्यादीची एकूण १९ लाख ४३ हजार ३८५ रुपयांची फसवणूक करण्यात आल्याने वर नमुदप्रमाने न्हावा शेवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा तांत्रिक तपास सायबर सेलच्या पोलीस निरीक्षक दिपाली पाटील व त्यांचे पथक करीत असताना तामिळनाडूस्थित एका कंपनीने गुन्ह्यात वापरलेली वेबसाईट बनविल्याचे निष्पन्न झाले. सदरची कंपनी ही ब्लॉकचैन डेव्हलपमेंट करणारी असून न्यायालयाकडून सर्च वॉरंट प्राप्त करून सदर कंपनीमध्ये सर्च घेतला असता त्या कंपनीने देशातील नामांकित कंपन्यांची क्लोन वेबसाईट बनविल्याचे तांत्रिक पुरावे मिळून आले.

…तर चौकाचौकात मराठी माणूस मार खाईल, मुंब्र्यातील ‘त्या’ प्रकारावरून मनसेची आगपाखड!

सदर गुन्ह्यात निष्पन्न सहा आरोपींनी उच्च न्यायालय, मुंबई येथे अटकपूर्व जामिनावर केलेला अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला. परंतु आरोपी पसार झाले होते.

या प्रकरणी क्लिष्ट तांत्रिक विश्‍लेषण करून ६ पैकी सेंथुर पांडियन, वय ३० वर्षे, रा.ठि- ७ वैरमणी स्ट्रीट, नर्सिंघम मेन रोड, कडाचनंदल/कटकिनरू, मदुराई, तामिळनाडू आणि तिरुपती अलगरस्वामी, वय ३५, रा. ठी. ३/७७, ईस्ट स्थित, मितुकुंदू, विरुधूनगर, तामिळनाडू मदुराई, तामिळनाडू या २ आरोपींना तिथून अटक करण्यात यश आले आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास पनवेल सायबर सेल करीत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -