Saturday, May 10, 2025

क्रीडा

Captain Jasprit Bumrah : सिडनी कसोटीत बुमराह भारताचा कर्णधार

Captain Jasprit Bumrah : सिडनी कसोटीत बुमराह भारताचा कर्णधार

सामना न खेळण्याचा रोहित शर्माचा निर्णय


नवी दिल्ली : भारतीय कर्णधार रोहित शर्मा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या कसोटी सामन्यात खेळणार नसल्याचे समोर आले आहे. रोहित शर्माने स्वतः हा सामना न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मांने भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांना याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे रोहितच्या जागी भारतीय उपकर्णधार जसप्रीत बुमराह संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.



३ जानेवारीपासून सिडनी क्रिकेट ग्राउंडवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ मधील पाचव्या आणि शेवटच्या कसोटीला सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हन मध्ये मोठा बदल झाला आहे. कर्णधार रोहित शर्मा या सामन्यातून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पुन्हा एकदा संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे. बुमराहच्या नेतृत्वाखाली, भारतीय संघाने पर्थ स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या मालिकेतील पहिला सामना २९५ धावांनी जिंकला होता. त्यानंतर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात रोहित शर्माने संघाचे नेतृत्व केले. मात्र, पुढच्या तीन सामन्यातील २ मध्ये भारतीय संघाचा पराभव झाला. एक सामना अनिर्णित राहिला. सामन्याच्या एक दिवस आधी म्हणजे गुरुवारी संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हे जसप्रीत बुमराहशी दिर्घ चर्चा करताना दिसले.

Comments
Add Comment