
पुणे : लोहगाव परिसरात संजय पार्क रस्त्यावरुन दुचाकीवर जात असलेल्या दीर-वहिनीच्या वाहनास पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या कारने जोरात धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दीर-वहिनीचा दुर्दैवीरित्या मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. आशीर्वाद गोवेकर (वय-५२) आणि रेश्मा रमेश गोवेकर (वय-४७) असे या अपघातात मयत झालेल्या दीर-वहिनीचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी प्रसाद गोवेकर (वय-५४, रा. गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रस्ता,पुणे) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

ठाणे : काही दिवसांपूर्वी कल्याणमध्ये एका इमारतीत सुरू झालेला किरकोळ वाद पुढे मराठी-अमराठी वादापर्यंत पोहोचला होता. त्यात एका अमराठी व्यक्तीकडून ...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातातील मृत आशीर्वाद गोवेकर आणि रेश्मा गोवेकर यांचे नाते दीर आणि भावजय असे आहे. रेश्मा यांची तब्येत बिघडल्याने आशीर्वाद गोवेकर दुचाकीवरून त्यांना खासगी रूग्णालयात घेऊन आले होते. उपचार घेतल्यानंतर दोघे दुचाकीवरून घरी निघाले होते. आशीर्वाद आणि रेश्मा हे दोघेजण लोहगाव परिसरातील संजय पार्क परिसरातून जात होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव कारने भीषण धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील आशीर्वाद यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर, अपघातात गंभीर जखमी झालेल्या सहप्रवासी रेश्मा यांचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दरम्यान, अपघाताची माहिती होताच सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय संकेश्वरी यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलीस निरीक्षक साहेबा पोटे पुढील तपास करत आहेत.