Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघातात ३ ठार तर तीनजण गंभीर जखमी

महाड : मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway) महाड येथील वीर स्थानकाजवळ मध्यरात्री भीषण अपघात झाला. मागून आलेल्या भरधाव टोईंग व्हॅनने बंद पडलेल्या स्कॉर्पिओला जोरदार धडक दिल्याने या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना महाड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.


गाडीतील डिझेल संपल्याने स्कॉर्पिओ जीप वीर स्थानकाजवळ बंद पडली होती. त्यामुळे गाडी रस्त्याच्या कडेला लावून प्रवासी गाडी शेजारी उभे होते. यावेळी मागून आलेल्या भरधाव टोईंग व्हॅनने बंद पडलेल्या स्कॉर्पिओला जोरदार धडक दिली. यात गाडी शेजारी असलेले सहा जण गंभीर जखमी झाले.



टोईंग व्हँनची धडक इतकी जोरात होती, की स्कॉर्पिओ गाडी पन्नास फूट लांब जाऊन सर्व्हिस रोडच्या पलीकडे असलेल्या खड्ड्यात जाऊन पडली. या दुर्घटनेत सूर्यकांत मोरे, साहिल शेलार (वय वर्ष २५) आणि प्रसाद नातेकर (वय वर्ष२५) सर्व रहाणार कुंभार आळी, महाड यांचा मृत्यू झाला. तर समिप मिंडे (वय वर्ष ३५) रहाणार दासगाव, सुरज नलावडे (वय वर्ष ३४) रहाणार चांभार खिंड आणि शुभम माटल (वय वर्ष २६) शिरगाव हे जखमी झाले आहेत.


घटनेची माहिती मिळताच पोलीस, तसेच स्थानिक बचाव यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी जखमींना महाड येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यापुर्वी तिघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी टोईंग व्हॅन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.

Comments
Add Comment

परभणीत मशाल पेटली, नांडेमध्ये कमळ फुलले

मुंबई : महापालिका निवडणुकीत सर्वत्र सत्ताधारी पक्षांचा बोलबाला दिसत असताना येथे मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे

मुंबई महापालिका निवडणूक निकालात काय घडले?

नार्वेकरांनी तिन्ही गड राखले मुंबई : कुलाबा विधानसभेत भाजपच्यावतीने विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर

उबाठा पहिल्यांदा बसणार मुंबईत विरोधी पक्षात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये मागील २५

राज्यातील २२ मनपात राज ठाकरेंच्या मनसेला भोपळा

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुकांचे निकाल लागले. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार,

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई (प्रतिनिधी) : ज्या काँग्रेसपायी उबाठा गटाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत

भाजपच्या विजयानंतर ‘रसमलाई’चा ट्रेंड

मुंबई : महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुक निकालात भाजपने सर्वाधिक जागा जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे.