Wednesday, March 19, 2025
Homeताज्या घडामोडीSayali Sanjiv Bold Look : 'New Year New Me' म्हणत केले सोशल...

Sayali Sanjiv Bold Look : ‘New Year New Me’ म्हणत केले सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर

मुंबई : अभिनेत्रींच्या फोटोंची चर्चा जगभरात असतेच. त्यातही त्यांचे बोल्ड फोटो असतील तर तो चाहत्यांसाठी चर्चेचा विषय ठरतो. अशातच सोज्वळ अभिनेत्री सायली संजीवने सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून प्रेम दाखवले आहे. नवीन वर्षाचं औचित्य साधून अभिनेत्री सायली संजीवने ‘New Year New Me’ असं कॅप्शन देऊन बोल्ड फोटो शेअर केले आहेत.

Navi Mumbai : कामोठेत बंद फ्लॅटमध्ये आढळला मायलेकांचा मृतदेह

‘काहे दिया परदेस’ या मराठी मालिकेतून सायली संजीव ‘गौरी’ या पत्रामुळे ओळखली जाऊ लागली. त्यानंतर झिम्मा, झिम्मा २, गोष्ट एका पैठणीची यांसारख्या अनेक चित्रपटांतून तसेच नाटकांमध्ये देखील सायलीने कामे केली आहेत.

 

सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोंमध्ये सायलीने काळ्या रंगाचा फ्लोरल प्रिंट स्विमसूट घातला आहे. स्विमिंग पूलमध्ये डोळ्याला गॉगल लावून सायलीने हटके पोज मध्ये फोटोशूट केलं आहे. सायलीच्या या फोटोंवर चाहते नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव करत तिला इंग्रजी नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -