

काँग्रेसला वाल्मिक कराडच्या जीवाची काळजी
चंद्रपूर : बीड जिल्ह्यातील सरपंच हत्या प्रकरणी वाल्मिक कराड सध्या पोलीस कोठडीत आहे. हत्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. वाल्मिक कराडची पोलीस चौकशी करत आहेत. ...
निवडणूक आयोगाने घोषणा केली नसली तरी एप्रिल - मे २०२५ मध्ये मुंबई - ठाण्यासह अनेक महापालिकांच्या निवडणुकांची शक्यता आहे. या निवडणुकांची घोषणा झाल्यास उद्धव गटातील अनेकजण सत्ताधाऱ्यांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या सतर्कतेमुळे एसटीचे २ हजार कोटी वाचले? मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
एसटी महामंडळासाठी बसेस भाडेतत्वावर घेण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांची स्थगिती मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सतर्कतेमुळे ...
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे विधानसभेत ५७ आमदार निवडून आले तर उद्धव गटाचे २० आमदार निवडून आले. उद्धव गटाचे बहुसंख्य आमदार हे मुंबईतले आहेत. यामुळे राज्याच्या उर्वरित भागातील शिवसैनिकांना एकनाथ शिंदे यांचेच नेतृत्व मान्य असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नव्या वर्षाची सुरुवात होताच उद्धव गट फुटणार असल्याच्या चर्चेला सुरुवात झाली आहे. उद्धव गटात असलेले राजापूरचे माजी आमदार राजन साळवी भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. उद्धव गटाचे वेगवेगळ्या शहरांतील माजी नगरसेवक भाजपा आणि शिवसेना नेत्यांच्या संपर्कात आहेत आणि लवकरच पक्षांतर करणार असल्याचे वृत्त आहे.