Friday, March 28, 2025
Homeब्रेकिंग न्यूजकाँग्रेसला वाल्मिक कराडच्या जीवाची काळजी

काँग्रेसला वाल्मिक कराडच्या जीवाची काळजी

चंद्रपूर : बीड जिल्ह्यातील सरपंच हत्या प्रकरणी वाल्मिक कराड सध्या पोलीस कोठडीत आहे. हत्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. वाल्मिक कराडची पोलीस चौकशी करत आहेत. पण काँग्रेस नेत्यांना हत्येचा संशयित आरोपी असलेल्या वाल्मिक कराडच्या जीवाची काळजी सतावत आहे. काही काँग्रेस नेत्यांची झोप वाल्मिक कराड पोलीस कोठडीत असल्यापासून उडाल्याचे वृत्त आहे.

Lonavla Ekvira Temple : बंदी असतानाही मुंबईकरांनी फोडलेल्या फटाक्यांमुळे मधमाशांचा भक्तांवर हल्ला

मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो. वाल्मिक कराडचा एन्काउंटर होऊ शकतो, अशी माहिती बड्या अधिकाऱ्याकडून मिळाल्याचा दावा काँग्रेस नेते विजय विजय वडेट्टीवार यांनी केला. वाल्मिक कराड ज्या पोलीस ठाण्यात आहे त्याच पोलीस ठाण्यात पाच पलंग मागवण्यात आले आहेत. ही वाल्मिक कराडचे लाड पुरवण्याची सुरुवात आहे. लवकरच त्याच्यासाठी एसी, फ्रीज, टीव्ही हे पण मागवले जाईल; असाही दावा विजय वडेट्टीवार यांनी केला. सरपंच हत्या प्रकरणात निःपक्षपाती चौकशी होणार नाही, अशीही भीती विजय विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. वेगवेगळे दावे आणि तर्कवितर्क करताना विजय वडेट्टीवार यांनी एकही ठोस पुरावा सादर केलेला नाही.

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या सतर्कतेमुळे एसटीचे २ हजार कोटी वाचले? मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

कोण आहे वाल्मिक कराड ?

महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी तपास संशयित आरोपी वाल्मिक कराड याचा पोलीस शोध घेत होते. आता पोलिसांच्या तावडीतून सुटका नाही आणि फार काळ बाहेर राहणे शक्य नाही याची जाणीव झाल्यानंतर वाल्मिक कराड शरण आला. सध्या वाल्मिक कराड पोलीस कोठडीत आहे. वाल्मिक कराड हा गंभीर गुन्ह्यांचा इतिहास असलेला आरोपी आहे. कराड विरोधात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -