Friday, February 7, 2025
Homeब्रेकिंग न्यूजNitesh Rane : राज्यातील बांधण्यात येणारी बंदरे दर्जेदार, गुणवत्तापूर्ण, कालमर्यादेत पुर्ण करावीत

Nitesh Rane : राज्यातील बांधण्यात येणारी बंदरे दर्जेदार, गुणवत्तापूर्ण, कालमर्यादेत पुर्ण करावीत

मंत्री नितेश राणे यांनी घेतला पुढील १०० दिवसांच्या कामांचा आढावा

मुंबई : राज्य शासनाच्या महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अंतर्गत बांधण्यात येणा-या बंदराचे काम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण आणि कालमर्यादेत करावीत यासाठी अधिकाऱ्यांनी दक्ष रहावे, गुणवत्तेत तडजोड खपवून घेतले जाणार नाही, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिले. महाराष्ट्र सागरी मंडळाच्या इमारतीत बंदरे विकास विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्र सागरी मंडळ ही महाराष्ट्र राज्याच्या औद्योगिक व आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी लहान बंदराच्या विकासासाठीची शिखर संस्था आहे. राज्याच्या किनारपट्टी भागात होत असलेला वाढता औद्योगिक विकास लक्षात घेता बंदरांना जास्तीतजास्त सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीकोनातून हया बंदरांचा विकास होणे अपेक्षित आहे. बंदरांचा विकास करतांना पारदर्शकता असावी. महाराष्ट्र राज्यातील लघु आणि मध्यवर्ती बंदरांच्या विकासाला चालना देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. महिनाभरात काही बंदरांचा उद्घाटन तर काही भुमीपुजन करण्यात येणार आहे. सर्व कामे पूर्ण असेल तरच उद्घाटन करावे. काही त्रुटी असतील तर तातडीने पूर्ण करावे. विविध उपक्रम राबविण्यासाठी धोरण ठरवा. रेडिओ क्लब काम लवकरात लवकर मार्गी लावण्यास प्रयत्न करावा असेही मंत्री राणे म्हणाले.

लक्ष्यवेधचा बिझनेस जत्रा उपक्रम येत्या ३ व ४ जानेवारी रोजी ठाण्यात

पुढील १०० दिवसांमध्ये बंदरे विकास विभागाने करावयाच्या कामांचा बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सविस्तर आढावा घेतला.यावेळी वाढवण बंदराचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले. यावेळी बंदरे विकास विभागाचे मा.अपर मुख्य सचिव(संजय सेठी), मा.मु.का.अ.(माणिक गुरसाळ) वरीष्ठ प्रशासकीय अधिकारी(प्रदिप बढीये), मुख्य अभियंता (राजाराम गोसावी)वित्तीय नियंत्रक नि. मुख्य लेखाधिकारी (सुरेश सारंगकर) यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच आयुक्त मत्स्यव्यवसाय विभागाचे श्री.अतुल पाटणे भा.प्र.से.,व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र मत्स्य उद्योग विकास मंडळ पंकज कुमार उपस्थित होते. तसेच जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष उन्मेष शरद वाघ हे देखील उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -