Friday, January 17, 2025
Homeब्रेकिंग न्यूजNilesh Rane : ऑनलाईन ऐवजी हस्तलिखित ७/१२ शासकीय भात खरेदीसाठी स्वीकारण्यात यावे...

Nilesh Rane : ऑनलाईन ऐवजी हस्तलिखित ७/१२ शासकीय भात खरेदीसाठी स्वीकारण्यात यावे व नोंदणीची मुदत वाढवा

आमदार निलेश राणे यांची अन्न व नागरी पुरवठा प्रधान सचिवांकडे मागणी

मुंबई : शासकीय आधारभूत किंमत खरेदी योजना सन २०२४- २०२५चे खरीप हंगाम अद्ययावत ई-पिक पेरा भात ऑनलाईन ७/१२ मिळण्यास तांत्रिक अडचणीमुळे हस्तलिखित ७/१२ शासकीय भात खरेदीसाठी स्वीकृती द्या याबाबतची मागणी आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी अन्न व नागरी पुरवठा प्रधान सचिव यांच्याजवळ पत्राद्वारे केली आहे.

या पत्रात आमदार निलेश राणे यांनी कोकणातील भात उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधले आहे. यात महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सिंधुदुर्ग व रत्नागिरी या कोकण पट्ट्यातील जिल्ह्यामध्ये भात शेतीचे ७/१२ हे अल्प क्षेत्राचे जास्त आहेत. साधारणतः १ गुंठ्यापासून ते २० गुंठ्यापर्यंतच्या क्षेत्राचे ७/१२ ची संख्या जास्त आहे. त्याच बरोबर कोकणातील शेतकऱ्यांना भात शेतीच्या जास्त ७/१२ मुळे स्वतः शेतामध्ये जाऊन ऑनलाईन ई- पिक नोंद करणे अडचणीचे होते.

मंजुरी मिळून १४ वर्षे झाली तरीही रस्ता कागदावरच; पालीत वाहतूक कोंडीचे विघ्न कायम

काही शेतकरी स्वतः ई-पिक नोंद करतात, परंतु त्यांनी स्वतः केलेल्या नोंदी पैकी काहीच ७/१२ वर ई-पिक नोंद होते तर उर्वरित ७/१२ वर सन २०२४-२५ ई-पिक नोंद होतच नाही. ही तांत्रिक अडचण खूप मोठी आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात शासकीय भात खरेदीच्या नोंदी आकडेवारीवरून कमी झाल्या आहेत. त्यामुळे हस्तलिखित नोंदींचे ७/१२ शासकीय भात खरेदीसाठी स्वीकारण्यात यावे. तसेच धान (भात) खरेदी नोंदणीची मुदत वाढवण्यात यावी. जेणेकरून कोकणातील शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही व भारत सरकारच्या चांगल्या हमिभाव योजनेचा फायदा दोन्ही जिल्यातील शेतकऱ्यांना होईल अशी मागणी आज आमदार निलेश राणे यांनी अन्न व नागरी पुरवठा प्रधान सचिव यांच्याजवळ केली आहे. याबाबतची माहिती आमदार निलेश राणे यांचे खाजगी सचिव योगेश घाडी यांनी दिली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -