

Lonavla Ekvira Temple : बंदी असतानाही मुंबईकरांनी फोडलेल्या फटाक्यांमुळे मधमाशांचा भक्तांवर हल्ला
लोणावळा : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक पर्यटकांनी समुद्रकिनारी गर्दी केली तर काहींनी नवीन वर्षाची सुरुवात देवदेवतांच्या दर्शनाने केली. ...
मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो. वाल्मिक कराडचा एन्काउंटर होऊ शकतो, अशी माहिती बड्या अधिकाऱ्याकडून मिळाल्याचा दावा काँग्रेस नेते विजय विजय वडेट्टीवार यांनी केला. वाल्मिक कराड ज्या पोलीस ठाण्यात आहे त्याच पोलीस ठाण्यात पाच पलंग मागवण्यात आले आहेत. ही वाल्मिक कराडचे लाड पुरवण्याची सुरुवात आहे. लवकरच त्याच्यासाठी एसी, फ्रीज, टीव्ही हे पण मागवले जाईल; असाही दावा विजय वडेट्टीवार यांनी केला. सरपंच हत्या प्रकरणात निःपक्षपाती चौकशी होणार नाही, अशीही भीती विजय विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. वेगवेगळे दावे आणि तर्कवितर्क करताना विजय वडेट्टीवार यांनी एकही ठोस पुरावा सादर केलेला नाही.

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या सतर्कतेमुळे एसटीचे २ हजार कोटी वाचले? मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
एसटी महामंडळासाठी बसेस भाडेतत्वावर घेण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांची स्थगिती मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सतर्कतेमुळे ...
कोण आहे वाल्मिक कराड ?
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी तपास संशयित आरोपी वाल्मिक कराड याचा पोलीस शोध घेत होते. आता पोलिसांच्या तावडीतून सुटका नाही आणि फार काळ बाहेर राहणे शक्य नाही याची जाणीव झाल्यानंतर वाल्मिक कराड शरण आला. सध्या वाल्मिक कराड पोलीस कोठडीत आहे. वाल्मिक कराड हा गंभीर गुन्ह्यांचा इतिहास असलेला आरोपी आहे. कराड विरोधात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.