Delhi Savarkar Collage : दिल्लीत स्वातंत्र्यवीरांच्या नावाने सुरू होणार महाविद्यालय

  56

पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संकुलाची पायाभरणी


नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने महाविद्यालय सुरू होणार आहे. ३ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्ली विद्यापीठा अंतर्गत २ संकुलाची पायाभरणी करणार आहेत. यापैकी एका महाविद्यालयाचे नाव स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाने असेल.


दिल्ली विद्यापीठात पूर्व आणि पश्चिम असे २ नवे कॅम्पस उभारले जाणार आहेत. यासंदर्भात २०२१ मध्ये दिल्ली विद्यापीठाने निर्णय घेतला होता. त्यानुसार द्वारका आणि नजफगढ भागात ३ महाविद्यालयाची निर्मिती केली जाणार आहे. यासाठी ६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च होणार आहे. या सर्व प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधान मोदी करणार आहेत. त्यात रोशनपुरा, नजफगढ येथे स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालयचाही समावेश आहे, ज्यामध्ये शिक्षणासाठी अत्याधुनिक सुविधा असतील. यासाठी १४० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तर सुरजमल विहार परिसरात तयार होत असलेल्या शैक्षणिक संकुलासाठी ३७३ कोटी रुपये तर द्वारका भागातील शैक्षणिक संकुलासाठी १०७ कोटी खर्च अपेक्षित आहे.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सीबीएसईच्या एकात्मिक कार्यालय संकुलाचे उद्घाटन केले जाणार आहे. तसेच अशोक विहार येथील स्वाभिमान अपार्टमेंट्स येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी नव्याने बांधलेल्या १६७५ सदनिकांचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. याबरोबर नौरोजी नगर येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि सरोजिनी नगर येथील जीपीआरए टाईप-२ क्वार्टर्स या दोन नागरी पुनर्विकास प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत.

Comments
Add Comment

मोठी बातमी: आयपीएस पराग जैन भारताचे नवे 'RAW' प्रमुख

प्रतिनिधी: भारताची परकीय गुप्तचर संस्था म्हणून जगभरातही ख्याती असलेल्या रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (Research and Analysis Wing (RAW)

Local Train Derails: तामिळनाडू पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली, प्रवाशांमध्ये गोंधळ

चित्तेरी स्थानकावरून ट्रेन सुटल्यानंतर काही वेळातच मोठा आवाज ऐकू आला चेन्नई: तामिळनाडूच्या रानीपेट जिल्ह्यात

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.

Kolkata Rape Case : लॉ विद्यार्थिनीवर बलात्कारप्रकरणी तिन्ही आरोपींना पोलिस कोठडी, ममता सरकार निशाण्यावर

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये राज्य सरकार संचालित दक्षिण कोलकाता लॉ कॉलेजशी संबंधित सामूहिक बलात्काराचा एक

MP News : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील १९ इनोव्हामध्ये भरले २० लीटर डिझेल, मात्र निघालं १० लीटर पाणीच पाणी

डिझेल भरायला गेल्या अन् पाणी भरून आल्या... मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.