Mobile Recharge Fraud : मोबाईल रिचार्ज करताय सावधान! एका झटक्यात होईल खातं रिकामं

Share

मुंबई : सध्या जगभरात सायबर क्राईमचे (Cyber Crime) जाळे मोठ्या प्रमाणात पसरत चालले आहे. हॅकरर्स सर्वसामान्यांकडून पैसे उकळण्यासाठी विविध फ्रॉडचा वापर करत आहेत. अशातच आता अशा नराधमांनी ‘फ्री रिचार्ज ऑफर’चा (Mobile Recharge Fraud) नवा घोटाळा सुरु केला आहे.

देशभरातील मोबाईल वापरकर्त्यांना भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) मोबाईल रिचार्जच्या बनावट ऑफर्सबाबत नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. सध्या घोटाळेबाज TRAIच्या नावाने मेसेज पाठवत आहेत आणि मोफत रिचार्जच्या नावाखाली फसवणूक करत आहे.

दरम्यान, TRAIने याबाबत कोणतीही ऑफर जारी केली नसल्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर कोणत्याही मोबाईल वापरकर्त्याला रिचार्जशी संबंधित फ्रॉड मेसेज आला असल्यास तातडीने टेलिकॉम ऑपरेटरच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी किंवा कस्टमर केअरशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

फ्रॉड मेसेजबाबात TRAIच्या उपाययोजना

  • सावध रहा : कोणत्याही संदेशावर त्वरित विश्वास ठेऊ नका.
  • तक्रार नोंदवा : अशा फसव्या संदेशांबाबत सायबर क्राइम पोर्टल https://cybercrime.gov.in किंवा संचार साथी पोर्टल https://sancharsaathi.gov.in वर तक्रार करा.
  • TRAI चा इशारा : TRAI ने आतापर्यंत १ लाखांहून अधिक बनावट संदेशांच्या साच्यांना ब्लॉक केलं आहे, ज्यामुळे अनेक वापरकर्त्यांना फसवणूक होण्यापासून वाचवण्यात आलं आहे.

Recent Posts

MI vs CSK, IPL 2025: मुंबई इंडियन्स मागील पराभवाचा वचपा काढणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…

22 minutes ago

लिंबू लोणचं

पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…

41 minutes ago

पुण्यात काँग्रेसला गळती, नेते आणि पदाधिकारी महायुतीच्या वाटेवर

पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…

52 minutes ago

भाषा हे राजकारण्यांच्या हातातले हत्यार नाही!

डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…

54 minutes ago

आदिवासी जमातीसाठी ती ठरली आरोग्यदूत

अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…

60 minutes ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, रविवार, २० एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…

1 hour ago