Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडीCrime : मुलीशी बोलतो या रागातून १७ वर्षीय मुलाची केली दगडाने ठेचून...

Crime : मुलीशी बोलतो या रागातून १७ वर्षीय मुलाची केली दगडाने ठेचून हत्या; मुलीचे वडील व २ भाऊ अटकेत

पुणे : आपल्या मुलीशी एक १७ वर्षीय मुलगा मैत्री करुन बोलत असल्याचा राग येऊन सदर मुलास मुलीच्या पालकांनी तिच्याशी बोलू नको अशी समज दिली होती. परंतु त्यानंतर देखील तो मुलीशी बोलत असल्याच्या रागातून मुलीचे वडील व भावांनी संबंधित मुलास लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करुन तसेच लोखंडी रॉड डोक्यात मारुन त्याला गंभीर जखमी करत डोक्यात दगड घालून त्याचा निर्घृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार वाघोली परिसरात घडला आहे. गणेश वाघू धांडे (वय-१७) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.

याप्रकरणी आरोपी लक्ष्मण पेटकर (६०), सुधीर पेटकर (३२) व नितीन पेटकर (३१, तिघे रा. वाघेश्वरनगर, गोरे वस्ती, वाघोली, पुणे) यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे.

याबाबत मयत मुलाचे वडील वाघु मारुती धांडे (वय- ६४, रा. वाघोली, पुणे) यांनी आरोपी विरोधात वाघोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

शिवसेना उबाठा गटाचे नगरसेवक भाजपाच्या वाटेवर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश धांडे हा दोन जानेवारी रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता त्याच्या मित्रांसोबत घराजवळ दुचाकीवरुन येत होता. त्यावेळी आरोपींनी मुलीशी बोलत असल्याचा राग मनात धरुन त्यास शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करुन लोखंडी रॉड व दगड त्याच्या डोक्यात मारुन त्याचा खून केला. त्यानंतर आरोपी पसार झाले.

पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यावर, घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेऊन घटनेचा पंचनामा करत शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठवला. तसेच आरोपींना देखील अटक केली. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक अहिरे करत आहेत.

वाघोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड म्हणाले, मयत मुलाचे वडील हे मजुरी काम करत होते व त्यांना मुलगा देखील सहाय्य करत होता. ते राहत असलेल्या ठिकाणाजवळच आरोपी यांचे कुटुंब राहत आहे. कुठल्यातरी अज्ञात कारणास्तव मनात राग धरुन आरोपींनी गणेश यास शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन लोखंडी रॉड व दगडाने मारहाण करत संगनमताने त्यास जीवे ठार मारले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -