मुंबई : आजपासून नव्या वर्षाला सुरुवात झाली आहे. अनेक गोष्टींच्या नियमावलीत बदल झाले आहेत. अनेक गोष्टींचे भाव उतरले असले तरीही काही वस्तूंच्या दरात वाढ होत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे. अशातच आता बँक खाते धारकांसाठीही महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
Mhada Lottery : नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हाडाकडून आनंदवार्ता!
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही गोष्टींच्या नियमावलीत बदल केला आहे. त्याचबरोबर आता देशातील सर्व बँकेतील काही खातेदारांचे खाते थेट बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. विविध बँकेतील वापरात नसलेले सर्व ग्राहकांचे बँक खाते आरबीआय रद्द करणार आहे. बँकीग व्यवस्था सुधारण्यासाठी आरबीआयने हा निर्णय घेतला आहे.
कोणत्या प्रकारचे खाते रद्द् होणार?
निष्क्रीय खाते, कोणतेही व्यवहार न होणारे आणि शून्य बँक बॅलेन्स असणारी सर्व खाती आरबीआय रद्द करणार आहे. वाढत्या सायबर गुन्हेगारी प्रकरण पाहता बँकींग व्यवहार न होणारी खाते सायबर गुन्ह्यांसाठी वापरली जाऊ शकतात. त्यामुळे आरबीआयने वरील प्रकारची खाते बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.