मुंबई : मुंबईत घरांच्या वाढत्या किमती पाहून सर्वसामान्यांना मुंबईत हक्काचं घर घेण्यासाठी म्हाडा किंवा सिडकोकडून निघणाऱ्या घरांच्या लॉटरीची वाट पहावी लागते. अशातच आज नववर्षाला सुरुवात झाली असून म्हाडाने पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांची स्वप्नपूर्ती होणारी आनंदाची बातमी दिली आहे. (Mhada Lottery)
म्हाडा प्राधनिकरणाकडून माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, म्हाडा यंदा मुंबईत अडीच ते तीन हजार घरांची लॉटरी काढणार आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर ही सोडत जाहीर करण्यात येणार आहे. तसेच यामध्ये अल्प आणि अत्यल्प गटाला सर्वाधिक प्राधान्य देत त्यांच्यासाठी मोठ्या संख्येनं घरं राखीव ठेवली जाणार आहेत.
Pandharpur Temple : नववर्षानिमित्त पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात फळांची आकर्षक सजावट!
कुठे असतील ही घरं?
मुंबईत घर घेण्यासाठी धडपड करणाऱ्यांना ही सोडत मोठा दिलासा देणार आहे. कारण, शहरातील मोक्याच्या ठिकाणी म्हाडाच्या या इमारती उभारल्या जाणार आहेत. मुंबईतील सायन, पवई, ताडदेव, विक्रोळी, घाटकोपर, बोरिवली, कांदिवली, गोरेगाव, जुहू, अंधेरी इथं ही घरं असतील. तसेच गोरेगाव पहाडी इथे बांधल्या जाणाऱ्या घरांचाही या सोडतीमध्ये समावेश असणार आहे. (Mhada Lottery)