स्टरलाईटच्या कार्यपद्धतीचे प्रकल्पग्रस्तांकडून कौतुक

तळोजा : मुंबईसह संपूर्ण एमएमआर रिजनला अखंड वीजपुरवठा उपलब्ध करून देणाऱ्या गेमचेंजर "मुंबई ऊर्जा मार्ग" प्रकल्पाचे काम विक्रमी वेळेमध्ये पूर्ण झाले आहे. हा प्रकल्प उभारणाऱ्या स्टरलाईट कंपनीने बधितांसाठी राबवलेल्या नियोजनबध्द कार्यपद्धतीचे शेतकरी तथा प्रकल्पग्रस्तांकडून विशेष कौतुक केले जात आहे.

भविष्यातील विजेची गरज ओळखून केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पाची आखणी केली. आणि या क्षेत्रातील अनुभवी आणि कुशल कंपनी म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्टरलाईटने अत्यंत विक्रमी वेळेत हा प्रकल्प पूर्ण करत नवा अध्याय रचला आहे. पण त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचे म्हणजे या कंपनीने राबवलेल्या प्रकल्पग्रस्त केंद्रीत नियोजनबध्द कार्यपद्धतीचे शेतकऱ्यांकडून मोठे कौतुक केले जात आहे.

स्टरलाईट कंपनीकडून या प्रकल्पग्रस्तांना योग्य तो भरीव मोबदला, दिलेल्या वेळेमध्ये त्याचे वितरण, प्रकल्पाचे काम होणाऱ्या जमिनीचा सातबाराही शेतकऱ्याच्याच नावावर राहणे, बाधित जमिनीचा शेतीसाठी पुनर्वापर आणि पर्यावरण अनुकूल कार्यवाही अशा महत्त्वाच्या ठळक मुद्द्यांमुळे या प्रकल्पाचे काम वेळेमध्ये पूर्ण होण्यास मदत झाली आहे.

कंपनीने राबवलेल्या या प्रकल्पग्रस्तकेंद्रीत नियोजनबध्द कार्यपद्धतीने इथल्या शेतकरी आणि प्रकल्प बाधितांमध्ये अत्यंत समाधानाचे वातावरण आहे. इतकेच नाही तर एक सामाजिक बांधिलकी जपत स्टरलाईट कंपनीने या भागांत केलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचेही शेतकरी आणि स्थानिक नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.

त्यामुळेच तर शेतकरी किंवा प्रकल्पग्रस्तांकडून कोणत्याही विरोधाशिवाय राज्याच्या दृष्टीने इतका मोठा गेमचेंजर प्रकल्प आज विक्रमी वेळेमध्ये पूर्ण झाला आहे. ज्याच्या पाऊलावर पाऊल टाकून इतर महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची पायाभरणी केली जात आहे.
Comments
Add Comment

Sangli School Van Accident : धक्कादायक! स्कूल व्हॅनचा भीषण अपघात; पाच वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू

सांगली : सांगलीतील शिराळा तालुक्यातून आटूगडेवाडी येथे स्कूल व्हॅनचा भीषण अपघात होऊन पाच वर्षीय मुलीचा जागीच

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ बनविण्यासाठी युवा कल्पनांना व्यासपीठ देण्यात येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

· ‘द गव्हर्नन्स चॅलेंज २०२६’चे चौथे पर्व घोषित · ३० नामांकित व्यवस्थापन व सार्वजनिक धोरण संस्थांमधील

Maharashtra News : राज्यातील प्रत्येक विभागात भव्य लोककला महोत्सव; आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्रातील लोककला आणि लोककलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी आता राज्याच्या प्रत्येक विभागात भव्य

ST Employees Salary : एसटीच्या 86 हजार कर्मचाऱ्यांना दिलासा; 11 ऑगस्टला खात्यात जमा होणार जुलैचे वेतन

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86 हजार कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन 11 ऑगस्ट रोजी

Nitesh Rane : मंत्री नितेश राणेंनी घेतली 'ताज हॉटेल्स'च्या सीईओंची भेट

मुंबई : राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी

Food Poisoning : आश्रमशाळेच्या जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधा; २७ मुले, ५ मुली उपजिल्हा रुग्णालयात

नांदेड : देगलूर तालुक्यातील हणेगावच्या वसंतराव नाईक निवासी आश्रमशाळेत जेवणातून