मुंबई : जगभरात नववर्षाच जंगी पद्धतीने स्वागत (New Year Celebration) करण्यात येत आहे. अशातच मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या मुंबई लोकलनेही (Mumbai Local) नव्या वर्षाचं स्वागत केलं आहे. या स्वागताचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.
LPG Price: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दिलासा, स्वस्त झाला LPG सिलेंडर
कसं झालं स्वागत?
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्टेशनवर असलेल्या इंडिकेटरवर कधी बारा वाचतायेत आणि नवीन वर्षात कधी उजाडते याची वाट पाहत मुंबईकर थांबले आहेत. बारा वाजताच ट्रेनची हॉर्न वाजवत नवीन वर्षाचे स्वागत करण्यात येत आaहे. मुंबई लोकलचा ‘हॅपी न्यू इयरवाला’ हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.