नववर्षात रेल्वे देणार चार आकर्षक गिफ्ट

नवी दिल्ली : रेल्वे ही बहुसंख्य भारतीयांसाठी जीवनवाहिनी आहे. ही रेल्वे नववर्षात अर्थात २०२५ मध्ये भारतीयांना चार आकर्षक गिफ्ट देण्याची तयारी करत आहे. या गिफ्टमुळे प्रवास आणखी आरामदायी, सुरक्षित आणि सुखकारक होणार आहे. रेल्वेच्या गिफ्टचा फायदा सामान्य प्रवाशांपासून ते फर्स्ट क्लास एसीच्या प्रवाशांपर्यंत सर्वांना होणार आहे.



भारतीय रेल्वेतून दररोज दोन कोटींपेक्षा जास्त नागरिक प्रवास करतात. या प्रवाश्यांच्या सोयीसाठी दररोज दहा हजारांपेक्षा जास्त रेल्वेगाड्या धावतात. यात वंदे भारत प्रकारच्या गाड्यांना प्रवाशांच सर्वाधिक पसंती मिळत आहे. देशातील वेगवेगळ्या मार्गांवर सध्या ५५ पेक्षा जास्त वंदे भारत गाड्या धावत आहेत. वंदे भारत गाड्यांच्या लोकप्रियतेत दिवसागणिक वाढ होत आहे. रेल्वेच्या इतर गाड्यांतील सोयीसुविधांमध्येही वाढ केली जात आहे.



१. रेल्वेमार्गे जम्मू : काश्मीर देशाशी जोडणार : रेल्वेमार्गे जम्मू - काश्मीर देशाशी जोडण्याचे काम सुरू आहे. श्रीनगर - कटरा रेल्वे मार्गाची चाचणी सुरू आहे. लवकरच माता वैष्णोदेवी कटरा ते बारामुला अशी वंदेभारत सुरू होणार आहे. कटरा ते बनिहाल हा १११ किमी. चा रेल्वे मार्ग तयार झाला आहे. या मार्गावर ९७.३४ किमी. चा मार्ग हा बोगद्यातून जातो. याच रेल्वे मार्गावर जगातील सर्वात जास्त उंचावर असलेला चिनाब नदीवरचा रेल्वेचा पूल आहे. या पुलावरून रेल्वे धावणार आहे.

२. वंदे भारत स्लीपर ट्रेन : देशात सध्या धावत असलेल्या वंदे भारत गाड्यांपैकी बहुसंख्य गाड्या या चेअर कार स्वरुपातील आहेत. नव्या वर्षात अनेक वंदेभारत स्लीपर ट्रेन पण सुरू होणार आहेत. तसेच नव्या वर्षात वंदे भारत प्रकारातील सर्व गाड्यांमधील सोयीसुविधांमध्ये वाढ करण्याचे नियोजन आहे. गाडीत प्रवाशांच्या सोयीसाठी वॉटर बॉटल स्टँड पण दिले जातील. वंदे भारत स्लीपर गाड्या या ताशी १३० किमी वेगाने धावाव्यात यासाठीचे नियोजन पण सुरू आहे. यामुळे प्रवास आणखी वेगवान, सुरक्षित, सुखकारक आणि आरामदायी होणार आहे.

३. पंबनचा पूल : तामिळनाडूत पंबन येथे रामेश्वरमला देशाच्या उर्वरित भागाशी जोडणारा समुद्रावरील पहिला सरळ उभ्या रेषेत खुला होणारा पूल उभारण्यात येत आहे. हा २.०५ किमी. लांबीचा पूल आहे. आधीच्या पुलाच्या तुलनेत हा तीन मीटर जास्त उंच आणि समुद्रसपाटीपासून २२ मीटर उंचावर असलेला हा पूल आहे. या पुलावरून जाणाऱ्या आणि येणाऱ्या रेल्वेगाड्या धावणार आहेत. जलवाहतुकीच्या सोयीसाठी दिवसातील ठराविक वेळा हा पूल सरळ उभ्या रेषेत खुला केला जाईल.

४. १३३७ रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण आणि पुनर्विकास : देशातील २७ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतील १३३७ रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण आणि पुनर्विकास करण्याच्या योजनेची अमलबजावणी २०२५ मध्ये होणार आहे. रेल्वे स्थानकांवर रूफ प्लाझा, इंटर मॉडेल कनेक्टिव्हिटी, मुलांसाठी खेळण्याकरिता सोयी, रेल्वे कियॉस्क, लिफ्ट, प्रतिक्षालय, फूड कोर्ट, वॉशरूम आदी सोयीसुविधा दिल्या जातील.
Comments
Add Comment

Divyastra Mk-3 : भारताची आकाशात आणखी एक झेप! ‘दिव्यास्त्र Mk-3’चे यशस्वी उड्डाण; स्वदेशी जेट ड्रोनची ताकद जगासमोर

Divyastra Mk-3 : भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. भारतात विकसित

Air India Express : एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवाशाने केला विमानतळावर गोळीबार; २ जण जखमी

वाराणसी : रविवार १६ ऑगस्ट रोजी सकाळी लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर शस्त्र तपासणीदरम्यान एका

Weather Alert India : देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; नेमका कुठे आणि कसा पाऊस पडणार? जाणून घ्या

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

PM Modi Speech : एका वर्षात एक कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र

Narendra Modi : 'सेमीकंडक्टरपासून अणुऊर्जेपर्यंत...'; जाणून घ्या पंतप्रधान मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला