मुंबई : गणपती बाप्पाच्या मूर्तीसोबत येणारी उंदीर मामाची मूर्ती अनेकांना आवडते. आरती म्हणताना अलिकडे गणपती बाप्पा मोरया, उंदीर मामा की जय असं म्हणणाऱ्यांची संख्याही वाढत चाललीय. पण हा हवाहवासा वाटणारा उंदीर मामा जेव्हा सजिव रुपात खरंच घरात शिरतो तेव्हा कोणालाही नको असतो.
Mhada Lottery : नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हाडाकडून आनंदवार्ता!
घरात एकदा उंदीर शिरला की लवकर बाहेर जात नाही. उंदराने घरात प्रवेश केला की नुकसान होण्यास सुरुवात होते. उंदराचा बंदोबस्त करण्यासाठी मग पिंजरा लावणे, उंदीर चिकटून राहील असे चिकट कागद वापरणे, उंदरांचा बंदोबस्त करणाऱ्या वड्या घरात ठिकठिकाणी ठेवणे हे प्रकार सुरू होतात. पण माणसांप्रमाणेच उंदीरही हल्ली हुशार झाले आहेत. सहजपणे अशा सापळ्यात अडकतील याची खात्री देता येत नाही. मात्र काही प्रभावी घरगुती उपाय केले तर उंदरांचा बंदोबस्त करणे शक्य आहे. हे उपाय वाजवी दरात आणि सहज करणे शक्य आहे. हे उपाय करुन बघा आणि उंदरांचा बंदोबस्त करा.
१. कांद्यामुळे होईल उंदराचा वांदा : ज्या भागात उंदराचा वावर आहे त्या भागात कांदा ठेवा. कांदा खाल्ल्यावर उंदराचा मृत्यू होतो किंवा उंदीर त्रास होऊ लागल्यामुळे घरातून बाहेर पडतो.
२. वापरा थोडा बेकिंग सोडा, उंदराला पळवा : साखर, बेकिंग सोडा, गहू पीठ हे तीन घटक समप्रमाणात घ्या आणि त्यापासून मळून छोटे गोळे तयार करा. हे गोळे ज्या भागात उंदराचा वावर आहे त्या भागात ठेवा. यातील एखादा गोळा खाल्ल्यावर उंदराचा मृत्यू होतो किंवा उंदीर त्रास होऊ लागल्यामुळे घरातून बाहेर पडतो.
३. काळी मिरी उंदरांचा बंदोबस्त करी : काळ्या मिरीचे दाणे अथवा काळी मिरी पावडर ज्या भागात उंदराचा वावर आहे त्या भागात ठेवा. काळी मिरी खाल्ल्यामुळे उंदराचा मृत्यू होतो किंवा उंदीर त्रास होऊ लागल्यामुळे घरातून बाहेर पडतो. काळी मिरी मिश्रीत पाणी फवारणीच्या बाटलीत भरून उंदरावर फवारले तरी उंदीर घरातून बाहेर पळून जाण्याची शक्यता वाढते.
४. उंदरांवर प्रभावी असलेले तेल : पेपरमिंट ऑईल, लेमन ऑईल, सिट्रेनेला ऑईल यापैकी कोणतेही एक तेल फवारणीच्या बाटलीत भरून उंदरावर फवारले तरी उंदीर घरातून बाहेर पळून जाण्याची शक्यता वाढते. तसेच पेपरमिंट ऑईल, लेमन ऑईल, सिट्रेनेला ऑईल यापैकी कोणत्याही एका तेलात बुडवलेले कापसाचे बोळे उंदरांचा वावर असलेल्या भागात ठेवा. या तेलांच्या उग्र वासाने उंदीर घरातून बाहेर पळून जाण्याची शक्यता वाढते.
५. रोपांचा उपाय : लव्हेंडर आणि डॅफोडिलची रोपं घरात लावा. या रोपांमुळेही उंदरांचा बंदोबस्त करणे शक्य आहे. ज्या भागात उंदरांचा वावर आहे त्या भागात तमालपत्र ठेवले तर उंदीर त्या भागाच्या आसापस फिरकत नाही.