
बंगळूर : आतापर्यंत देवाकडे भाविक मूल-बाळ होण्यासाठी, आजारपणातून बरं होण्यासाठी काहीजण परीक्षेत पास होणं, स्वप्न पूर्ण होणं अशा वैयक्तिक कारणाचे नवस करतात. मात्र कर्नाटकमध्ये एका अज्ञात व्यक्तीने अजब-गजब नवस केल्याचे समोर आले आहे. (Karnataka Temple)

पुणे : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख निर्घृण हत्या प्रकरणातील मोठी बातमी समोर आली आहे. बीड सरपंच हत्येप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड ...
कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील एका देवीकडे 'सासू मरु देत' असा नवस केला आहे. अज्ञाताने २० रुपयाच्या नोटवर 'माझ्या सासूचा लवकर मृत्यू होऊ दे' असे लिहले आहे. कलबुर्गी जिल्ह्यातील अफझलपुर तालुकाच्या कातादरगी भागात भाग्यवंती मंदिर आहे. त्या मंदिरातील व्यवस्थापनाने दानपेटीतील रकमेची मोजणी सुरू केली होती. दानपेटीत २० रूपये सापडले. २० रूपयामध्ये एका अज्ञात व्यक्तीनं 'माझ्या सासूचा लवकर मृत्यू होऊ दे' असं लिहिलेलं आढळलं.
दरम्यान, ही नोट नेमकी कोणी टाकली हे समोर आलेलं नाही. परंतु कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील या प्रकरणाची सध्या गावभर चर्चा होत आहे. (Karnataka Temple)