पुणे : भारतीय सैन्यदलाचा ७७ वा वर्धापन दिन यंदा पुण्यात साजरा होत आहे. यानिमित्त आळंदी रस्त्यावरील बॉम्बे सॅपर्स या लष्करी संस्थेच्या मैदानावर भव्य कार्यक्रम होणार आहे. यानिमित्त ३ ते १५ जानेवारीदरम्यान विविध कार्यक्रम संपन्न होत आहेत.
भारत देश स्वतंत्र होताच १५ जानेवारी १९४९ रोजी भारतीय लष्कराच्या प्रमुखपदी ले. जन. के. एम. करिअप्पा यांची निवड झाली. तेव्हापासून १५ जानेवारी हा भारतीय लष्कराचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. शहरात १५ जानेवारी रोजी होणार्या कार्यक्रमास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) अनिल चौहान, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
Ghatkopar Hoarding Collapsed : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील फरार आरोपीला लखनौमधून अटक!
दक्षिण कमांड येथे ३ ते ५ जानेवारीदरम्यान आर्मी मेळ्याचे आयोजन केले आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत प्रवेश खुला राहणार आहे. आळंदी रस्त्यावरील बॉम्बे सॅपर्स या सैन्यदलाच्या मैदानावर लष्कराच्या वतीने संचलनासह अत्याधुनिक शस्त्रांंचे विलोभनीय दर्शन होणार आहे. तसेच, लष्कराच्या वतीने मिशन ऑलिम्पिकसारखे सजीव देखावे साकारणारे रथ या ठिकाणी पाहावयास मिळणार आहेत.