मुंबई : नववर्ष सुरु होण्यास अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. नववर्षानिमित्त अनेक ठिकाणी नवी नियमावली जाहीर केली आहे. त्याप्रमाणे नवीन वर्षात रेशन कार्डबाबतही काही नियम बदलणार आहेत. भारत सरकार नॅशनल फूड सिक्युरिटी अॅक्टअंतर्गत रेशन कमी किमतीत मिळणार आहेत. मात्र यासाठी रेशन कार्ड धारकांना ई-केवायसी करणे बंधनकारक असणार आहे. आज त्याची अंतिम तारीख असणार आहे. तर ज्या नागरिकांनी ई-केवायसी केले नाही त्यांचे रेशन कार्ड रद्द होऊ शकणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आजच हे काम करुन घ्या, असे आवाहन करण्यात आले आहे.
काय आहे प्रक्रिया?
रेशन कार्ड धारकांना जवळील रेशन कार्ड दुकानावर जाऊन ई-केवायसी करावी लागणार आहे. यासाठी तुम्हाला रेशन कार्ड दुकानावर जाऊन आधार कार्ड द्यावे लागेल. त्यानंतर पोओएस मशीनवर फिंगरप्रिंट टाकावे लागेल. त्यानंतर मोबाईलच्या मदतीने ई-केवायसी करु शकतात.