Sunday, March 23, 2025
Homeमहाराष्ट्रCM Devendra Fadnavis : महाराष्ट्रात चित्रीकरण करण्यास ‘एक खिडकी’द्वारे ऑनलाईन परवानगी

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्रात चित्रीकरण करण्यास ‘एक खिडकी’द्वारे ऑनलाईन परवानगी

मुंबई : सांस्कृतिक व सामाजिक प्रबोधनाबरोबरच सांस्कृतिक कार्य विभागाशी निगडीत विविध माध्यमातून रोजगार निर्मितीही मोठ्या प्रमाणात होते. हा विभाग सॉफ्ट पॉवर म्हणून काम करतो. त्यामुळे मराठी चित्रपटाचे सर्व चलछायाचित्रण मोठ्या प्रमाणात गोरेगाव येथील चित्रनगरीत व्हावे यासाठी आकारण्यात येणारे दर कमी करावे. कुठल्याही निर्मात्याला महाराष्ट्रात चित्रीकरण करण्यासाठी एक खिडकीद्वारे तात्काळ ऑनलाईन परवानगी देण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. (CM Devendra Fadnavis)

Ration Card e-Kyc : आजच करा ‘हे’ काम अन्यथा उद्यापासून रेशन धान्य होईल बंद!

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (punyashlok Ahilyadevi Holkar) यांच्या त्रिशताब्दी जन्मवर्ष सोहळ्याचे विशेष आयोजन करून त्याचे कार्य सर्व शाळा, कॉलेज, महाविद्यालयांपर्यत पोहोचले पोहोचण्यासाठी वर्षभराचे नियोजन करण्याच्या सूचना करून मुख्यमंत्री म्हणाले की,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य देशभरात खूप मोठे असल्याने त्यांच्यावर एक चांगला व्यावसायिक चित्रपट तयार करण्यात यावा. या चित्रपटासाठी शासनाकडून अनुदान देण्यात यावे. हर घर संविधान अंतर्गत प्रत्येक घरात संविधान पोहचले पाहिजे, अशाही सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत केल्या.

सह्याद्री अतिथीगृह येथे सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुढील १०० दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री फडणवीस यांनी आढावा घेतला. या बैठकीस अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲङ आशिष शेलार, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे,परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री योगेश कदम, मुख्य सचिव सुजाता सौनिक आदी उपस्थित होते. (CM Devendra Fadnavis)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -