
पुणे : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख निर्घृण हत्या प्रकरणातील मोठी बातमी समोर आली आहे. बीड सरपंच हत्येप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) तीन आठवड्यांपासून फरार झाले होते. दरम्यान आज त्यांनी व्हिडिओ शेअर करत पुण्यात सीआयडीसमोर (Pune CID) शरण आला आहे.

मुंबई : घाटकोपर येथील पेट्रोल पंपावर सात महिन्यांपूर्वी महाकाय होर्डिंग कोसळले (Ghatkopar Hoarding Collapsed) होते. या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाल्याची घटना यावर्षी ...
मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात केज पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी पोलिसांकडून शोध सुरु असताना वारंवार वाल्मिक कराड यांचे नाव समोर येत होते. हत्या प्रकरणात संबंध असल्याचा ठपका ठेवण्यात आलेले वाल्मिक कराड तीन आठवड्यांपासून फरार होते. तर आज वाल्मिक कराड स्वत: पुणे सीआयडीकडे शरण गेला आहे. तसेच ते सीआडीच्या गाडीने न जाता स्वत:च्या गाडीने गेले आहेत.
सरेंडर होण्यापूर्वी दिली प्रतिक्रिया
'मी वाल्मीक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे. मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड येथे सरेंडर होत आहे. सरपंच संतोष भैय्या देशमुख यांचे जे कोणी मारेकरी आहे, त्यांना अटक करावी. त्यांना फाशीची शिक्षा व्हावी. केवळ राजकीय द्वेषापोटी या प्रकरणाशी माझे नाव जोडले जात आहे. पोलीस निष्कर्षात मी जर दोषी आढळल्यास न्यायदेवता जे काही शिक्षा देईल ते मी भोगण्यास तयार आहे. अशी प्रतिक्रिया कराड यांनी दिली आहे.
दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर तीन आरोपी फरार झाले आहेत. सध्या फरार आरोपींचा शोध सुरु आहे.