Monday, May 12, 2025

ताज्या घडामोडीअध्यात्म

वर्षातील शेवटच्या सोमवती अमावस्येला काय करावे आणि काय करू नये ?

वर्षातील शेवटच्या सोमवती अमावस्येला काय करावे आणि काय करू नये ?
मुंबई : हिंदू धर्मात सोमवती अमावस्येला महत्त्व आहे. सोमवती अमावस्या म्हणजे सोमवारी येणारी अमावस्या. यंदाच्या वर्षातली शेवटची सोमवती अमावस्या ही सोमवार ३० डिसेंबर २०२४ रोजी आहे. सोमवती अमावस्येला शंकराची पूजा करतात. अनेक ठिकाणी शिवलिंगाचे पूजन केले जाते. शिवलिंगाची मनापासून पूजा केल्यास घरात शांतता आणि सुखसमृद्धी लाभते. या दिवशी तर्पण, श्राद्ध आणि पिंड दान केल्याने पितरांचा आशीर्वाद लाभतो. मनातील सदिच्छा पूर्ण होतात असेही सांगतात.



वर्षातल्या शेवटच्या सोमवती अमावस्येची सुरुवात सोमवारी ३० डिसेंबर रोजी पहाटे चार वाजून एक मिनिटांनी झाली. ही सोमवती अमावस्या मंगळवार ३१ डिसेंबर रोजी पहाटे तीन वाजून ५६ मिनिटांनी संपेल.



सोमवती अमावस्येला काय करावे ?

सोमवती अमावस्येला तर्पण, श्राद्ध आणि पिंड दान केल्याने पितरांचा आशीर्वाद लाभतो. सोमवती अमावस्येला पवित्र नदीत अथवा पवित्र तलावात अथवा पवित्र कुंडात स्नान करावे. यामुळे पापक्षालने होते आणि पुण्यसंचय होतो. गरजूंना यथाशक्ती दान करावे. भगवान शंकराची आराधना करावी. घर आणि भोवतालचा परिसर स्वच्छ करावा. स्वच्छता राखावी. सोमवती अमावस्येला आजारी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांची सेवा करावी.



सोमवती अमावस्येला काय करू नये ?

सोमवती अमावस्येला वाद घालणे, खोटे बोलणे टाळावे. सोमवती अमावस्येला मांसाहार आणि मद्यपान करणे टाळावे. अहंकार आणि दुराभिमान टाळावा. कायद्याचे उल्लंघन करणे टाळावे.
Comments
Add Comment