
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील (Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University) पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पदवीधर विद्यार्थ्यांसह अभियांत्रिकी, फार्मसी, लॉ, बीएएड, एमएडच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. येत्या दिवसातच ही परीक्षा सुरू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाला लागा असे आवाहन करण्यात येत आहे.

मुंबई: लग्न हे एक असे बंधन आहे जे मजबूत ठेवण्यासाठी आणि दीर्घकाळ टिकवण्यासाठी प्रेम आणि सन्मानाची गरज असते. लग्नाच्या नात्यात विश्वास आणि पारदर्शकता ...
मिळालेल्या माहितीनुसार, मागील वर्षापासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने पदव्युत्तर पदवीसाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा अवलंब केला आहे. आता चालू शैक्षणिक वर्षात पदवीसाठीही हे धोरण लागू केले आहे. त्यानुसार येत्या १ जानेवारी २०२५ पासून सुरू होणार आहे.
दरम्यान, परीक्षेच्या कालावधीत कोणताही गैरप्रकार किंवा कॉपी न होण्यासाठी विद्यापीठाने विशेष काळजी घेतली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने कॉपीमुक्त परीक्षेसाठी तीन भरारी पथके नेमली आहेत.