Monday, May 12, 2025

देशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

UPI New Rule : आरबीआयने बदलला यूपीआयचा 'हा' नियम; युजर्सना होणार फायदा?

UPI New Rule : आरबीआयने बदलला यूपीआयचा 'हा' नियम; युजर्सना होणार फायदा?

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) नवीन वर्षाच्या सुरुवातील अनेक नियमावलीत बदल करण्यात येतो. अशातच आता नववर्षापासून युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) चा नवीन नियम जाहीर करण्यात आला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने यूपीआयच्या नवीन नियमाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे यूपीआय युजर्संना चांगला फायदा होणार आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, रिझर्व्ह बँकेने UPI 123 Pay च्या ट्रान्झॅक्शन लिमिटमध्ये बदल केले आहेत. याआधी UPI 123 Pay युजर्स ५ हजार रुपयांपर्यंत ट्रान्झॅक्शन करु शकत होते. मात्र आता आरबीआयने या ट्रान्झॅक्शन लिमिटमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, युजर्स आता १० हजार रुपयांचे ट्रान्झॅक्शन करु शकणार आहेत. हा नियम १ जानेवारी २०२५ पासून लागू करण्यात आहे.

Comments
Add Comment