मेलबर्न: भारत आणि ऑस्ट्रेलिया(IND vs AUS) यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकतील चौथा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड खेळवला जात आहे. या सामन्यातील पाचव्या आणि शेवटच्या दिवसाचा खेळ सुरू आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारताला विजयासाठी ३४० धावांचे आव्हान दिले आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने ३ विकेट गमावत ३३ धावा केल्यात. यशस्वी जायसवाल क्रीझवर आहे. भारताला जर विजय मिळवायचा असेल तर ९२ षटकांत हे आव्हान पार करावे लागेल.
ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २३४ धावांवर आटोपला. भारताकडून दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराहने ५ विकेट घेतल्या. याआधी भारतीय संघाने पहिल्या डावात ३६९ धावा केल्या होत्या. भारताकडून नितीश कुमार रेड्डीने ११४ धावांचे योगदान दिले होते. सामन्याच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या संघाने ४७४ धावा केल्या होत्या. म्हणजेच पहिल्या डावाच्या आधारावर ऑस्ट्रेलियाला १०५ धावांची आघाडी मिळाली होती.
WTC Final मध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला, पाकिस्तानला हरवत मिळवले स्थान
आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरूवात धीमी झाली. रोहित शर्मा आणि यशस्वी जायसवालने नव्या बॉलवर मोठे शॉट्स मारण्याचे प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे भारताला १६ षटकांत केवळ २५ धावा करता आल्या. रोहित शर्मा ९ धावांवर बाद झाला. त्यानंतर केएल राहुलही झटपट बाद झाला. राहुलला खातेही खोलता आले नाही. तर विराट कोहली ५ धावा करून झेलबाद झाला.