Pune News : नववर्षाच्या स्वागतासाठी पुणे वाहतुकीत बदल; अनेक रस्ते बंद!

'असे' असतील पर्यायी मार्ग


पुणे : नववर्षाच्या सुरुवातीला अवघा एक दिवस शिल्लक राहिला आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि येत्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेकजण पर्यटनस्थळी जात आहेत. याच पार्श्वभूमीवर पुणेकर देखील नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडी लक्षात घेता प्रशासनाने पुणे वाहतुकीत बदल केले आहेत. अनेक मार्ग बंद करण्यात आले असून वाहन चालकांचा खोळंबा टाळण्यासाठी पर्यायी मार्गही उपलब्ध करुन दिले आहेत.


दरम्यान, यावेळी पुणे पोलिसांचा अनेक ठिकाणी मोठा फौजफाटा तैनात केले असून पोलिसांची नागरिकांवर करडी नजर असणार आहे. लोकांची गर्दी कमी होईपर्यंत हे निर्बंध लागू असणार आहेत.



काय आहेत पर्यायी मार्ग?



  • महात्मा गांधी रस्त्यावरील १५ ऑगस्ट चौक ते अरोरा टॉवर्स चौकदरम्यान वाहनांना प्रवेश बंदी असून येथील वाहतूक खुरेशी मस्जीद आणि सुजाता मस्तानी चौकाकडे वळवण्यात आली.

  • व्होल्गा चौकातून महंमद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक ईस्ट स्ट्रीटवरून इंदिरा गांधी चौकाकडे वळवण्यात आली आहे.

  • इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. ही वाहतूक लष्कर पोलीस ठाण्याकडे वळवण्यात आली.

  • सरबतवाला चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. ही वाहतूक ताबूत रस्त्यावर वळवण्यात आली.

  • कोथरूडकडून फर्गुसन कॉलेजला जाणारी वाहतूक खंडुजीबाबा चौक येथे थांबविण्यात येणार आहे. तर या भागातील वाहतूक विधी महाविद्यालय रस्ता, प्रभात रस्ता, अलका चित्रपटगृहाकडे वळविण्यात आली आहे.

  • जंगली महाराज रस्त्यावर होणारी गर्दी विचारात घेऊन झाशीची राणी चौकातून वाहतूक बंद करण्यात आली. या भागातील वाहतूक गोखले स्मारक चौक, पुणे महापालिका भवन, ओंकारेश्वर मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज रस्तामार्गे वळवण्यात आली.


कोणत्या भागात नो व्हेहीकल झोन? 



  • गुड लक हॉटेल ते फर्गुसन कॉलेज मेन गेटपर्यंत 'नो व्हेईकल झोन' लागू केला आहे. (No Vehicle Zone) 

  • इस्कॉन मंदिराकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता, तसेच अरोरा टॉवर्सकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.


फर्ग्युसन कॉलेज रोड आणि महात्मा गांधी रोडवर ३१ डिसेंबरला संध्याकाळी ५ ते १ जानेवारीला पहाटे ५ वाजेपर्यंत पार्किंगला बंदी असेल.

Comments
Add Comment

शेतकऱ्यांसाठी मंत्री महाजनांचा मोठा निर्णय, सुपूर्द केला वर्षभराचा ‘पगार’

जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी मंत्री गिरीश महाजन यांनी

अमरावती महानगरपालिकेला ई-बस डेपो-व चार्जींग सुविधेसाठी बडनेरा येथील जमीन

अमरावती : अमरावती महापालिकेला केंद्र शासन पुरस्कृत पी.एम.ई बस योजनेतून मिळालेल्या ई-बस डेपो व चार्जींग

दिवाळीच्या सुट्टीत फिरण्याचे नियोजन करताय ? 'या' चार जागांना नक्की भेट द्या

मुंबई : पावसाळ्यातली हिरवळ अनुभवल्यानंतर आता गुलाबी थंडीची चाहुल सर्वांना लागली आहे. त्यामुळे छान थंड हवेच्या

अतिवृष्टीग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांकडून तब्बल ३१,६२८ कोटींची मदत; २५३ तालुक्यांना सरसकट मदत देणार

'खरडून गेलेल्या जमिनीला' मिळणार हेक्टरी ३.४७ लाखांची मदत; शेतकरी, घरे आणि जनावरांसाठी भरीव निधी मुंबई:

'आवडेल तेथे प्रवास', दिवाळीसाठी एसटीची आकर्षक योजना, कमी खर्चात प्रवासाची सुवर्णसंधी

मुंबई : अवघ्या काहीच दिवसांवर दिवाळी सण येऊन ठेपला आहे. त्यापूर्वीच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने म्हणजेच

ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण देण्यास विरोध

मुंबई (प्रतिनिधी) : ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने २ सप्टेंबर रोजी