Friday, March 28, 2025
Homeसाप्ताहिकअर्थविश्वनिर्देशांक मंदीत सावधानता आवश्यक

निर्देशांक मंदीत सावधानता आवश्यक

डॉ. सर्वेश – सुहास सोमण

मागील आठवड्यात देखील निर्देशांकातील मंदी कायम राहिली. या आठवड्यात निर्देशाकांची मासिक एक्सपायरी झाली. आता चालू जानेवारी महिन्यापासून निर्देशाकांच्या लॉट साईजमध्ये देखील बदल झालेला आहे. दीर्घमुदतीचा विचार करता निफ्टीची १७६७ अत्यंत महत्त्वाची खरेदीची पातळी असून पुढील काळात ही घसरण अशीच कायम राहिल्यास निफ्टी आणखी १००० ते १५०० अंकांची घसरण दाखवू शकते. यासाठी सर्व प्रथम मध्यम मुदतीच्या चार्टनुसार महत्त्वाची असणारी २३२६३ ही खरेदीची पातळी तोडून निर्देशांक या पातळी खाली स्थिरावले तर निफ्टीमध्ये आणखी मोठी घसरण अल्पमुदतीचा विचार करता देखील २३२६७ ही पातळी आहे. जोपर्यंत या पातळीच्या वर निर्देशांक आहेत तोपर्यंत निर्देशांक पुन्हा एकदा बाऊन्स बॅक करू शकतात.

मी मागील लेखात सांगितल्याप्रमाणे या मोठ्या करेक्शननंतर अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झालेली असून अनेक शेअर्स आकर्षक किंमतीला आलेले आहेत. एचडीएफसी बँक, सुला विनयार्ड, एसबिआय लाईफ, बंधन बँक यासारख्या अनेक शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्यामुळे अनेक शेअर्समध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम संधी आहे. त्यामुळे आत्ता झालेल्या घसरणीचा फायदा घेत टप्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे. फ्युचर ऑप्शनमध्ये निर्देशांक निफ्टी सेन्सेक्स, फिननिफ्टी, बँकनिफ्टी यांच्या लॉट साइज्मध्ये बदल झालेले आहेत.

पुढील काही आठवड्यांचा विचार करता निफ्टीची २३५२० ही महत्त्वाची पातळी असून जर ही पातळी तुटली, तर निफ्टीमध्ये आणखी २०० ते ३०० अंकांची घसरण होईल. त्याचवेळी २४३०० ही महत्त्वाची विक्रीची पातळी असून जर ही पातळी तोडून यावर निर्देशांक निफ्टी स्थिरावली तरच पुन्हा निफ्टी अल्प मुदतीसाठी तेजीमध्ये येईल. पण एकूण मध्यम आणि दीर्घमुदतीचा विचार करता सावधानता बाळगणे आवश्यक आहे.

(सुचना: लेखकाची तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाईकांची लेखात सुचवित असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतीही गुंतवणूक नाही किंवा सुचविलेल्या कंपन्यांशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून कंपनीकडून कोणतेही मानधन किंवा भेटवस्तू घेतलेली नाही)

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -