Tuesday, May 6, 2025

ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजरायगड

Outdoors Shawarma : उघड्यावरचा शॉरमा खाताय तर सावधान!

Outdoors Shawarma : उघड्यावरचा शॉरमा खाताय तर सावधान!

रायगड : उघड्यावरचे पदार्थ खाल्ल्याने अनेक रोगांना बळी पडलेली खूप उदाहरणे आहेत. अशातच उघड्यावरील अन्नपदार्थ खाल्याने ५ जणांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही विषबाधा उघड्यावरचा शॉरमा खाऊन झाली असल्याची माहिती समोर आली आहे.


उरण तालुक्यातील चिरनेर गावामधील दिघोडे बस स्थानक जवळील उघड्यावर विकला जाणारा शॉरमा हा खाद्यपदार्थ खाल्याने ५ जणांना विषबाधा झाल्याची घटना शनिवारी ( दि२८) रोजी रात्री घडली आहे. शॉरमा हा खाद्यपदार्थ खाल्याने सदर मुलांच्या पोटात दुखायला लागले व उलट्या होऊ लागल्याने त्यांना तातडीने गावातील रवि क्लिनिक या रुग्णालयात दाखल करण्यात आले असता रुग्णालयातील डॉक्टर प्रकाश मेहता यांनी मुलांवर उपचार सुरू केले.सदरची विष बाधा ही शॉरमा हा खाद्यपदार्थ खाल्याने झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.


/>

डॉ प्रकाश मेहता यांच्या तत्परतेने सदर रुग्णांचे प्राण वाचले आहेत. तरी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी नागरीकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या व उघड्यावर विक्री करणाऱ्या अशा व्यवसायिकांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.

Comments
Add Comment