सुनीता नागरे
आजही आदिवासी महिलांच्या हाताला काम नाही. आदिवासी महिलांचे रोजगारामध्ये गुणोत्तर कमी आहे. अशा भागात महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना खंबीरपणे त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी अभिषेक शैक्षणिक संस्था काम करत आहे. जेणेकरून महिला आपले कुटुंब चांगल्या पद्धतीने सांभाळू शकेल आणि आपल्या मुलांना शिक्षण देऊ शकतील. ही संस्था महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांसाठी काम करते. संस्थेच्या प्रयत्नातून तब्बल दरवर्षी साडेचार हजार मुलांना शालेय साहित्य देऊन शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य केले आहे. या कामांमध्ये अनेक संस्थांचा मोलाचा सहभाग देखील मिळत आहे. त्याचप्रमाणे आदिवासी महिलांसाठी दरमहा आरोग्य शिबिरे राबविण्यात येतात. ज्यामध्ये अनेक प्रकारच्या आरोग्य चाचण्या, मोफत औषधे,अनेक आरोग्यदायी योजनांचा लाभ देऊन आदिवासी बांधवांचे मोफत ऑपरेशन करण्याचे काम संस्था करीत असते.
अनेक आदिवासी पाड्यातील स्त्रिया योजनांपासून वंचित आहेत. मासिक पाळीवर आदिवासी महिला आजही मनमोकळेपणाने बोलत नाहीत. आदिवासी पाड्यातील ज्या महिला आजही कापड, गोणपाट, राख वापरतात. त्यामुळे अशा महिला कॅन्सरसारख्या आजाराला बळी पडतात. अशा महिलांसाठी कार्यशाळा घेऊन त्यांना आरोग्याचे महत्व पटवून दिले जाते. तसेच या संस्थेद्वारे दरवर्षी महिलांपर्यंत मोफत सॅनेटरी पॅड पोहोचविण्यात येते. अजूनही महाराष्ट्रातील विविध भागातून संस्थेकडे मुलांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात मागण्यासाठी कॉल येतात. भविष्यात त्या प्रत्येक आदिवासी नागरिकांपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. भविष्यात एकही आदिवासी मुले शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत. देश स्वतंत्र होवून ७६ वर्षे झाली तरीही माझा आदिवासी बांधव त्याच्या मिळणाऱ्या हक्काच्या मुलभूत सुविधांपासून वंचित आहे.
आजही महाराष्ट्रातील आदिवासी पाड्यात काम करताना तेथील लोक त्यांच्या समस्या घेऊन आमच्याशी संपर्क साधतात.
सरकारने आदिवासी बांधवांच्या मूलभूत सुविधा त्या प्रत्येक आदिवासी बांधवांपर्यंत पोहचण्यासाठी काम करणे गरजेचे आहे परंतु सरकारने देखील आदिवासी बांधवांच्या मूलभूत सुविधा त्यांच्यापर्यंत कशा पोहचवल्या जातील, जात प्रमाणपत्र मिळण्याच्या अटी शिथिल कराव्यात जेणेकरून त्यांना आपले आदिवासी असल्याचे प्रमाणपत्र व इतरही कागदपत्रे काढण्यासाठी मदत होईल. गरजेचे अभिषेक शैक्षणिक सामाजिक संस्था भविष्यात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील प्रत्येक आदिवासी बांधवांपर्यंत आम्ही पोहोचणार आहोत. आपणही आमच्या सोबत जोडून सामाजिक कार्याला हातभार लावू शकतात.