
लडाख : भारतीयांसाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा आता चीनच्या सीमेलगत उभारण्यात आला आहे. भारतीय लष्कराकडून या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. त्यामुळे आता हिमालयाच्या पर्वतरागांतही मराठा साम्राजाचा भगवा फडकणार आहे.

पुणे : महापालिकेकडून रोज ९० एमएलडी (दशलक्ष लिटर प्रतिदिन) सांडपाणी प्रक्रिया न करता थेट मुळा आणि मुठा नदीत सोडले जात आहे. त्यामुळे सांडपाण्यावर ...
मिळालेल्या माहितीनुसार, महाराजाचां हा पुतळा पराक्रम, दूरदृष्टी आणि न्यायाचे प्रतिक आहे. देशभरात त्यांना मानणार तसेच त्यांचा आदर्श घेणारा मोठा वर्ग आहे. यादरम्यान भारतीय लष्कराने पूर्व लडाखमध्ये भारत चीन सीमेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला असून नुकतेच या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे.
दरम्यान, छत्रपती शिवरायांचा सर्वात उंचावरील पुतळा लडाखमधील पँगँग सरोवराजवळ उभारण्यात आला आहे. २६ डिसेंबर रोजी लडाखमधील पँगाँग तलावाच्या काठावर १४,३०० फूट उंचीवर असलेल्या या पुतळ्याचे अनावरण भारतीय लष्कराकडून करण्यात आले.