पुणे : महापालिकेकडून रोज ९० एमएलडी (दशलक्ष लिटर प्रतिदिन) सांडपाणी प्रक्रिया न करता थेट मुळा आणि मुठा नदीत सोडले जात आहे. त्यामुळे सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते थेट नदीत सोडल्यामुळे जलप्रदूषण होऊन माशांचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पुणे महापालिकेला नोटीस बजावली आहे.
महापालिकेचा नायडू सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि नदी परिसराची मंडळाच्या आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली. त्या वेळी नदीच्या दोन्ही बाजूंना मृत मासे आढळून आले. नायडू सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या नजीक तीन नाल्यांमधून येणारे सांडपाणी थेट नदीत मिसळत आहे. यामुळे नदीतील माशांचा मृत्यू झाला आहे.
Railway Jobs : रेल्वेत नोकरीच्या आमिषाने निवृत्त लष्करी जवानाची फसवणूक
नाल्यातील सांडपाणी काळ्या रंगाचे, दुर्गंधीयुक्त असून, त्याचे पीएच मूल्य ६ ते ७ आहे. याच बरोबर जुना नायडू सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पाडण्यात आला असला, तरी नवीन प्रकल्पाचे काम अद्याप पूर्ण झाले नसून, तो सुरू झालेला नाही. या प्रकल्पाला अजून वीजपुरवठ्याची पर्यायी सोय करण्यात आलेली नाही.