सेऊल: दक्षिण कोरियाच्या मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी एक विमान रनवेवरून खाली घसरल्याने भीषण अपघात(Plane Accident) झाला. या विमानात १७५ प्रवासी व ६ क्रू मेंबर्सचा समावेश होता. या अपघातात सकाळपर्यंत ६२ जणांचा मृत्यू झाला होता. मात्र आता हा आकडा तब्बल १७७वर पोहोचला आहे.
या अपघाताचा व्हिडिओही समोर आला आहे. यात विमान रनवेवरून खाली घसरताना दिसत आहे. तसेच पुढे जाऊन ते फेसिंगला आदळते. आदळल्यानंतर विमानात जोरदार स्फोट होतो आणि त्यांच्या चिंधड्या उडतात. टक्कर झाल्यानंतर विमानाला लगेचच आग लागते.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे विमान थायलंड येथून बँकॉकच्या दिशेने जात होते. हे विमान स्थानिक वेळेनुसार सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास दक्षिण-पश्चिम विमानतळावर उतरत असताना रनवेवरून घसरले आणि फेसिंगला आदळले. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या फोटो तसेच व्हिडिओमध्ये विमानाला आग लागल्याचेही दिसत आहे. तसेच चारही बाजूला धूर आणि आग पसरलेली आहे.
⚡️DRAMATIC moment South Korean plane with reported 180+ passengers becomes a fireball and crashes at airport CAUGHT on cam pic.twitter.com/VdrdavEXgT
— RT (@RT_com) December 29, 2024
लँडिंग गिअरमध्ये बिघाड
न्यूज एजन्सीच्या माहितीनुसार विमानात १७५ प्रवासी आणि ६ क्रू मेंबर्स होते. १७५ प्रवाशांमध्ये १७३ प्रवासी हे दक्षिण कोरियाचे होते आणि दोन थायलंडचे नागरिक होते. न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाल्याच्या कारणाने विमान रनवेवरून भटकले आणि फेसिंगला आदळले. विमानाला आग कशामुळे लागली याचाही तपास केला जात आहे.
Kazakhstan Plane Crash : कझाकिस्तानमध्ये विमान कोसळून चक्काचूर!