राज्यात भाजपाचे दीड कोटी सदस्य बनविणार ! - चंद्रशेखर बावनकुळे 

राज्यात १ ते १५ जानेवारी दरम्यान अभियान


नवी दिल्ली : महाराष्ट्रात भाजपाचे दीड कोटी सदस्य करू, असा निर्धार प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भारतीय जनता पार्टीच्या संघटन पर्व अभियानाच्या नवी दिल्लीतील केंद्रीय कार्यशाळेत व्यक्त केला. दरम्यान,याच कार्यशाळेत महाराष्ट्रातील अभूतपूर्व विजयाबद्दल प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांच्या उपस्थितीत रविवारी दिवसभर ही कार्यशाळा झाली. संघटनेच्या विस्तारावर देशव्यापी चर्चा झाली. देशभरातील सर्व राज्यांचे प्रदेश अध्यक्ष, प्रदेश प्रभारी, संघटन मंत्री, प्रमुख पदाधिकारी व केंद्रीय पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील अभूतपूर्व विजयाबद्दल प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांनी बावनकुळे यांचे अभिनंदन आणि कौतुक केले. पक्षाचे मुंबई अध्यक्ष श्री आशीष शेलार यांचाही सत्कार कऱण्यात आला.



महाराष्ट्राची संघटनात्मक माहिती


राज्यात सुरु झालेले सदस्यता नोंदणी अभियान व त्या विषयाचे नियोजन याबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांनी सविस्तर निवेदन व सादरीकरण केले. १ जानेवारी ते १५ जानेवारी दरम्यान अभियान राज्यभरात राबविणार असून, पाच जानेवारीला विशेष अभियान घेण्यात येणार असल्याचे सांगून ते म्हणाले, मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांपासून बूथ कार्यकर्त्यापर्यंत संपूर्ण संघटना बूथ वर सदस्यता नोंदणी करणार आहे. नवीन वर्षात १२ जानेवारी रोजी शिर्डी येथे महाराष्ट्र प्रदेश महा अधिवेशन घेण्यात येणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.



सन्मान कार्यकर्त्यांना अर्पण


सत्काराला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले की, आजचा हा क्षण माझ्यासाठी अभिमानाचा तर आहेच आहे, पण पार्टीने माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांवर टाकलेला विश्वास सार्थ ठरवणारा, पार्टी नेतृत्वाने दिलेल्या दायित्वाची पूर्णतः करणारा तसेच फलश्रुती असलेला आहे.आजचा सत्काराचा क्षण मी माझ्या मनात जपून ठेवत आहे. हा सन्मान मी माझ्या कार्यकर्त्यांना अर्पण करतो. प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी, गृहमंत्री श्री अमितभाई शाह, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डाजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कष्टाचा माझ्या आजच्या यशात खूप मोठा वाटा आहे, याची मला जाणीव आहे. त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मार्गदर्शन मला मोलाचे ठरले अशी भावना बावनकुळे यांनी व्यक्त केली.

Comments
Add Comment

सैन्याने १६ हजार फूट उंचीवर मोनोरेल चालवली

ईटानगर : भारतीय लष्कराच्या गजराज कॉर्प्सने एक इन-हाऊस हाय-अल्टिट्यूड मोनोरेल सिस्टम विकसित केली आहे. हे स्मार्ट

बिहारमधील विजयानंतर बोलले पंतप्रधान मोदी, सर्वपक्षीय नेत्यांचे आणि नागरिकांचे मागितले सहकार्य

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये एनडीएने मिळवलेल्या विजयाचा उत्सव आज दिल्लीत रंगला. निकाल

पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा दोन जागांवर विजय

नवी दिल्ली : देशातील सात राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघामधे झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली. भाजप आणि

देशभरात सहा कोटी मृतांचे आधारकार्ड सक्रिय

नवी दिल्ली : आधारकार्ड ओळखीचा पुरावा ग्राह्य धरला जातो. आधारकार्ड असेल तरच बँक खाते उघडले जाते. सरकारी योजनांचा

बिहारची तरुण आमदार होणार २५ वर्षांची मैथिली ठाकूर, निवडणुकीत ११,७३० मतांनी विजयी

Biharelection2025 : बिहार विधानसभा निवडणुकीत दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर मतदारसंघाने या वेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कारण

बिहारमध्ये भाजपचा दणका: मुख्यमंत्री कोण होणार? आता एनडीएचा 'हा' मोठा निर्णय!

तावडे म्हणाले, 'वॅकन्सी' नव्हती, हा जातीच्या पलीकडचा विजय! पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने मिळवलेल्या