मेलबर्न: भारत आणि ऑस्ट्रेलिया(IND vs AUS) यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकतील चौथा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड खेळवला जात आहे. या सामन्यातील चार दिवसांचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ९४ बाद २२८ इतकी होती. स्कॉट बॉलँड १० आणि नाथन लायन ४१ धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाचा संघाकडे एकूण ३३३ धावांची आघाडी आहे.
भारतीय संघ रचणार इतिहास?
आता पाचव्या दिवसाचा खेळ रोमहर्षक असणार आहे. या दिवशी तीन निकाल लागू शकतात. भारताचा विजय, ऑस्ट्रेलियाचा विजय अथवा सामना अनिर्णीत. हे आता स्पष्ट झाले आहे की भारताला कमीत कमी विजयासाठी ३३४ धावांचे आव्हान मिळेल. मात्र हे आव्हान सोपे नाही. भारताला विजय मिळवायचा असेल तर वेगाने बॅटिंग करावी लागेल. भारतीय संघाला दुसऱ्या डावात चांगली सुरूवात मिळाली तर ते विजयाच्या जवळ पोहोचू शकतात. सुरूवातीला दोन-तीन विकेट पडल्यास भारतीय फलंदाज अनिर्णीतच्या दिशेने जाऊ शकतात.
मेलबर्नच्या मैदानावर चौथ्या डावात धावांचा पाठलाग करणे सोपे नाही. या मैदानावर केवळ एकदाच ३००हून अधिक धावांचे आव्हान पार करता आले आहे. १९२८मध्ये इंग्लंडने असे केले होते. तेव्हा त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३२२ धावांचे आव्हान तीन विकेट गमावत मिळवले होते. पाहिल्यास या मैदानावर टॉप ५मध्ये तीन यशस्वी धावांचा पाठलाग इंग्लंडच्या नावावरच आहे.
भारतीय संघाला केवळ एकदाच मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडमध्ये आव्हानाचा यशस्वीपणे पाठलाग करता आला आहे. असे २०२०मध्ये झाले होते. यावेळेस अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात टीम इंडियाने ७० धावांचे आव्हान २ विकेट गमावत पूर्ण केले होते. २०११मध्ये जेव्हा भारतीय संघाला २९२ धावांचे आव्हान मिळाले होते तेव्हा ते आव्हान त्यांना पूर्ण करता आले नव्हते. त्यावेळेस भारतीय संघाचा १२२ धावांनी पराभव झाला होता.