Friday, May 9, 2025

विदेशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Canada Plane Crash : दक्षिण कोरियानंतर कॅनडामध्ये विमानाचा मोठा अपघात!

Canada Plane Crash : दक्षिण कोरियानंतर कॅनडामध्ये विमानाचा मोठा अपघात!

ओटावा : आज पहाटेच्या सुमारास दक्षिण कोरियामध्ये विमानाचा लँडिंगदरम्यान मोठा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर काही तास उलटले असताना पुन्हा विमानाचा अपघात घडल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. एअर कॅनडाच्या विमानाला Halifax Airport वर लॅन्डिंगच्या वेळेस (Canada Plane Crash) अपघात झाला आहे. या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचमड व्हायरल होत आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, PAL एअरलाइन्सचे विमान क्रमांक AC2259 सेंट जॉन्स येथून टेकऑफ झाले, हॅलिफॅक्स विमानतळावर लँडिंगसाठी रनवेवर उतरणार होते. मात्र लँडिंग गिअर तुटल्यामुळे विमानाची चाक घासली गेली असून विमानाला आग लागली आहे. अद्यापही या अपघातात जीवितहानी झाल्याचे समोर आले नाही. मात्र अनेक प्रवासी अपघातात जखमी झाले असून सध्या सर्व जखमींवर उपचार सुरु आहेत. (Canada Plane Crash)

Comments
Add Comment