सोलापूर : सोलापूरमधील (Solapur News) पंढरपूरजवळ भाविकांच्या खासगी भसचा भीषण अपघात (Pandharpur Accident) झालाय. या घटनेत दोन भाविकांचा मृत्यू झालाय. यामध्ये काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेय. भटुंबरे गावाजवळ आज पहाटे खासगी बस आण ट्रकचा भीषण अपघात झालाय. अपघात इतका भीषण होता की खासगी बसचा चुराडा झालाय. प्रवासाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत.
Chameli Ber : बोरं आहेत की ॲप्पल? मार्केटमध्ये ‘चमेली’ खातेय भाव!
पंढरपूरजवळ भाविकांच्या खासगी बसला भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झालाय. तर अनेकजण जखमी आहेत. पंढरपूर- टेंभुर्णी महामार्गावर आज पहाटे मालवाहतूक ट्रक आणि खासगी बसचा भीषण अपघात झाला. पंढरपूर जवळ असलेल्या भटुंबरे गावाजवळ पहाटे अपघात झाल्याचं समजतेय.
अपघातामधील जखमींना पंढरपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेय. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. स्थानिकांनीही तात्काळ धाव घेत मदत केली.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकने खासगी बसला जोरदार धडक दिली. ट्रकच्या पुढील बाजूचा चुराडा झालाय. बसचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेय.