Wednesday, March 26, 2025
Homeताज्या घडामोडीSunil Tatkare : सागरी महामार्गाचे काम चार ते पाच वर्षात होणार पूर्ण; खासदार...

Sunil Tatkare : सागरी महामार्गाचे काम चार ते पाच वर्षात होणार पूर्ण; खासदार सुनील तटकरे यांचा विश्वास

अलिबाग : कोकणच्या विकासात महत्वपूर्ण ठरणा-या सागरी महामार्गावरील आठ पूलांच्या कामाकरिता निधी मंजूर झालेला आहे. त्यांची कामे आता वेगाने होतील. त्यात बरोबर महामार्गाच्या कामाल गती देण्यात येईल. परिणामी सागरी महामार्गाचे काम येत्या चार ते पाच वर्षात पूर्ण होईल, असा विश्वास रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी अलिबाग येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

दरम्यान मुंबई गोवा महामार्गावरील इंदापूर व माणगांव बायपासचे काम रखडले होते. तेथील भूमीसंपादनाची समस्या दुर झाली आहे. त्यामुळे या दोन्ही बायपासच्या कामांना आता वेग येईल. हे दोन्ही बायपास मार्ग सुरु झाल्यावर सध्या इंदापूर व माणगांव मधील वाहतूक कोंडीची समस्या पूर्णपणे संपेल व प्रवास वेगवान होईल. येथील सद्यस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेऊन, हे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी पाठपूरावा करणार असल्याचेही खा. तटकरे यांनी सांगितले.

NCP : दिल्लीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची ‘दादा’गिरी, ११ उमेदवारांची यादी जाहीर

याच मार्गाला जोडून पुढे कोकणच्या ग्रीनफिल्ड सागरी महामार्गाची रचना करण्यात आली आहे. यामुळे किनारपट्टीचा प्रवास गतिमान होऊ शकणार आहे. हा महामार्ग पूर्ण होण्यासाठी पाच मोठी सागरी पुले बांधावी लागणार आहेत. यामध्ये उरण-रेवस या सागरी पुलाचे काम सुरू झालेले आहे. दुसरे पूल आहे, आगरदांडा-दिवेआगर तर तिसरे पूल आहे हरिहरेश्वर-बाणकोट, चौथेपूल आहे दाभोळ-जयगड या सर्व पूलांना ग्रीनफिल्ड सागरी महामार्गाच्या नव्या रचनेत मंजूरी देण्यात आली आहे. मात्र हा महामार्ग होण्यास आणखी चार ते पाच वर्षे लागणार आहेत. किनारपट्टी सागरी महामार्गाची नवी रचना होत असताना दुस-या बाजुला आजच्या डिजिटल युगामध्ये नवतंत्रज्ञानाद्वारे सागरी किनारपट्टी विकास हाती घेण्यात आला आहे. देशातील १२ बंदरे आंतरराष्ट्रीय बंदरे म्हणून विकसीत होत आहेत, असेही ते म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -