Prajakta Mali : फिल्म इंडस्ट्रीतील महिलांबाबत 'असे' वक्तव्य शोभत नाही; अभिनेत्री प्राजक्ता माळीकडून जाहीर माफीची मागणी

मुंबई : अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) यांच्याबद्दल बीडचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या विधानामुळे मोठी चर्चा उडाली आहे. आमदार धस यांनी बीडमधील 'इव्हेंट पॉलिटिक्स' असा शब्द वापरून धनंजय मुंडेंवर टीका केली. यावेळी त्यांनी प्राजक्ता माळीचे नाव घेतल्यामुळे उलट-सुलट चर्चांना उधाण आले. यावर प्राजक्ता माळीने मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. सुरेश धसांच्या एका निराधार विधानामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागल्याचं म्हणत त्यांनी जाहीर माफी मागायला हवी, अशी ठाम भूमिका प्राजक्ता माळीनं घेतली आहे.


प्राजक्ता माळी म्हणाल्या, “कलाकारांचे काम म्हणजे वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करणे. मी परळीपासून ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांपर्यंत काम केले आहे. यापूर्वी अनेक राजकीय नेत्यांबरोबर माझे फोटो आहेत. पण त्याचा संदर्भ घेऊन कोणत्याही व्यक्तीस माझं नाव जोडण्याचा हक्क तुम्हाला कसा आहे? हे एक महिला कलाकार म्हणून मला अत्यंत निंदनीय वाटते. महाराष्ट्रातील राजकारण्यांना हे शोभत नाही. अशा प्रकारची टिप्पणी करून, आपण महिलांच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहात आणि त्यांचा कर्तृत्वही कमी लेखत आहात.”



तसेच, प्राजक्ता माळीने पुढे असेही स्पष्ट केले की, फिल्म इंडस्ट्रीतल्या महिलांना सॉफ्ट टार्गेट केलं जातं. “राजकारणासाठी फिल्म इंडस्ट्रीतील महिलांची नावे वापरणे अत्यंत चुकीचे आहे. प्रसारमाध्यमांमध्ये हास्य निर्माण करण्यासाठी अशा टिप्पण्यांचा वापर होतो, पण यामुळे त्या महिलांच्या आयुष्यात वादळ येऊ शकते, त्यांचे करीअर खराब होऊ शकते. अशा परिस्थितीत त्या मानसिक त्रासात जाऊ शकतात. माझ्या आईला दीड महिना शांत झोप लागली नाही. माझ्या भावाने सर्व सोशल मीडिया डिलीट केला. माझ्या कुटुंबावर याचा गंभीर परिणाम झाला आहे,” असं ती म्हणाली.


प्राजक्ता माळीने या संदर्भात महिला आयोगाकडे तक्रार केली असून, "मी त्यांना विनंती करते की त्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करावी. मीही कायदेशीर कारवाई करत राहीन," असे तिने सांगितले.


प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना देखिल विनंती केली की, याबद्दल ठोस कारवाई करावी. "समाजात फिल्म इंडस्ट्रीतील महिलांची प्रतिमा अशा प्रकारे डागाळणं आणि त्याला तोंड देणं सोपी गोष्ट नाही," असं ती म्हणाली.


महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना हे कृत्य शोभत नाही. ते बोलले ते इतकं कुत्सित आहे. तुम्ही फक्त महिला कलाकारांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत नाही आहात. महिलांच्या कर्तृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहात. कुठल्या राजकारण्यांच्या कुबड्यांशिवाय एखादी महिला स्वकर्तृत्वावर यशस्वी होऊ शकत नाही का? अशी टिप्पणी करून तुम्ही स्वत:ची मानसिकता दाखवत आहात”, अशा शब्दांत प्राजक्ता माळीनं आपला संताप पत्रकार परिषदेत व्यक्त केला.


प्रसारमाध्यमांसमोर हशा पिकवण्यासाठी त्यांनी त्या टिप्पणीचा वापर केला. प्रसारमाध्यमांसमोर कसं बोलावं याचं त्यांना भान नाहीये. मी त्यांना विनंती करते की त्यांनी तितक्याच विनम्रतेनं जाहीरपणे माझी मागावी. फक्त माझीच नाही, ज्या महिलांचा त्यांनी चुकीचा उल्लेख केलाय, त्यांचीही त्यांनी माफी करावी. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनाही मी विनंती करते. या व्यक्ती दोन वाक्य बोलून गेल्या. पण प्रसारमाध्यमं त्यातूनच हजार व्हिडीओ बनवतात. इतके वाईट मथळे देतात. समोरच्या माणसाच्या आयुष्यात तुमच्या या मथळ्यांमुळे वादळ येऊ शकतं, त्यांचं करीअर बरबाद होऊ शकतं, त्या नैराश्यात जाऊ शकतात. त्या आत्महत्या करू शकतात, अशा उद्विग्न भावना प्राजक्ता माळीने यावेळी व्यक्त केल्या.



आमचं क्षेत्र बदनाम नाहीये, ही मंडळी ते बदनाम करतायत


जर हजार कार्यक्रमांत हजार माणसांबरोबर नावं जोडली गेली तर इथून पुढे कलाकार राजकीय नेत्यांनी आयोजित केलेल्या कुठल्या कार्यक्रमाला जातील का? तेही धजावणार नाहीत. पुढे कुणी कला क्षेत्रात मुलांना पाठवणार नाहीत. कलाक्षेत्र बदनाम नाही. ही सगळी मंडळी ते बदनाम करतात. आम्ही मनोरंजन करण्याचं काम करतो, पण तुम्ही आमची नावं मनोरंजनासाठी वापरता. स्वार्थासाठी वापरता. हे अत्यंत चुकीचं आहे. महिलांची नावं लगेच तोंडावर कशी येतात? पुरुषांची नावं कशी येत नाहीत?, असा सवालही प्राजक्ता माळीनं उपस्थित केला आहे.



कायदेशीर मार्गाने कारवाई करेन


तिथं बीडमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असताना तुमची गाडी कलाकारांवर का घसरते? हे सगळं कितपत योग्य आहे, तुमचं राजकारण तुम्हाला लखलाभ. त्यांनी माफी मागितली नाही तर, कायदेशीर मार्गाने माझ्या वकिलांमार्फत कारवाई करेन, असंही तिनं म्हटलं आहे.

Comments
Add Comment

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या

मुंबईकरांना यंदा पाण्याचे ‘नो टेन्शन’

पुरवठा करणाऱ्या धरण, तलाव क्षेत्रांतील पाणीसाठा ९८.४० टक्के शेवटच्या १७ दिवसांत १.६० टक्के साठ्याचे

Rain Update : आठवड्याच्या शेवटी पावसाने धरला जोर, अनेक ठिकाणी कोसळधारा, हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पावसाच्या जोरदार सरी कोसळत