
#WATCH | Former Prime Minister #DrManmohanSingh laid to rest with full state honours after leaders and family paid last respects at Nigam Bodh Ghat in Delhi.
Former PM Dr Manmohan Singh died on 26th December at AIIMS Delhi.
(Source: DD News) pic.twitter.com/MvAJsZefrt
— ANI (@ANI) December 28, 2024

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना सातत्याने लक्ष्य करणारे भाजपा आमदार सुरेश धस (Suresh Dhas) ...
मान्यवरांकडून श्रद्धांजली
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या घरी जाऊन पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले आणि पुष्पांजली अर्पित केली. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याआधी शनिवारी सकाळी डॉ. मनमोहन सिंग यांचे पार्थिव काँग्रेसच्या मुख्यालयात नेण्यात आले. काँग्रेसच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी डॉ. मनमोहन सिंग यांचे अंत्यदर्शन घेतले. यानंतर दिल्लीतील निगमबोध घाट येथे डॉ. मनमोहन सिंह यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

'असे' असतील पर्यायी मार्ग पुणे : बहुजन समाजाचा लोकदेव असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाची येत्या सोमवारी सोमवती यात्रा (Jejuri Somvati Yatra) भरणार आहे. ३० डिसेंबर ...
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांची कारकिर्द
डॉ. मनमोहन सिंग यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ला पाकिस्तानमधील गाह या गावी झाला. त्यांनी १९४८मध्ये पंजाब विश्वविद्यालय येथून मॅट्रिकचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी आपले पुढील शिक्षणक ब्रिटनच्या केंब्रिज विश्वविद्यालयातून घेतले. १९५७मध्ये त्यांनी अर्थशास्त्रामध्ये प्रथम श्रेणीतून ऑनर्सची डिग्री मिळवली. यानंतर १९६२मध्ये त्यांनी ऑक्सफोर्ड युनिर्व्हसिटीच्या नूफिल्ड कॉलेज येथून अर्थशास्रात डी.फिल केली. डॉ मनमोहन सिंग आणि त्यांची पत्नी श्रीमती गुरशरण कौर यांच्या तीन मुली आहेत.

पुणे : पुणेकरांसाठी (Pune News) आनंदाची बातमी समोर आली आहे. सध्या पुणे शहरात दोन वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. मात्र पुणेकरांचा प्रवास अधिक सोपा आणि जलद ...
भारताचे चौदावे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आपली नम्रता, कर्मठता आणि कार्याच्या प्रती कटिबद्धतेसाठी ओळखले जातात. मनमोहन सिंह यांनी १९६६ ते १९६९ या काळात संयुक्त राष्ट्रात काम केलं. ते १९७१मध्ये वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार होते. नंतर १९७२ मध्ये त्यांची नियुक्ती अर्थ मंत्रालयात मुख्य आर्थिक सल्लागार या पदावर झाली. डॉ. सिंग यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, योजना आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे अध्यक्ष, पंतप्रधानांचे सल्लागार, विश्वविद्यालय अनुदान आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम केले. मनमोहन सिंग हे १९९१ ते १९९६ दरम्यान भारताचे अर्थ मंत्री होते.

बुलढाणा : मकर संक्रांतीच्या (Makar Sankranti) अगोदर व नंतर काही दिवस पतंग उडविण्याचे प्रमाण जास्त असते. त्यासाठी नायलॉन मांजा (दोरा) या धाग्याचा (Nylon Manja) मोठ्या ...
पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या नेतृत्वातील भारताच्या उदारमतवादी धोरणाचे जनक अशीही मनमोहन सिंग यांची एक ओळख आहे. देश आर्थिक संकटाशी सामना करत केंद्रीय अर्थमंत्री म्हणून मनमोहन सिंग यांनी खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाचा मार्ग अवलंबला आणि देशाची अर्थव्यवस्था रुळावर येण्यास मदत झाली. डॉ. मनमोहन सिंह २००४ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीएचे पंतप्रधान झाले. यानंतर २००९ मध्ये ते सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले.