Tuesday, March 18, 2025
HomeदेशManmohan Singh: निगमबोध घाटावर होणार मनमोहन सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार

Manmohan Singh: निगमबोध घाटावर होणार मनमोहन सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार

नवी दिल्ली: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर शनिवारी दिल्लीच्या निगमबोध घाटावर ११.४५ वाजता अंत्यसंस्कार होणार आहे. अंत्य संस्काराचा कार्यक्रम गृहमंत्रालयाने जारी केला आहे. अंत्यसंस्कारामध्ये सहभागी होण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मंत्री निगमबोध घाटावर पोहोचतील.

काँग्रेसचे महासचिव के सी वेणुगोपाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी २८ डिसेंबरला सकाळी साडेनऊ वाजता दिल्लीस्थित एआयसीसी मुख्यालय येथून मनमोहन सिंग यांचे पार्थिव निगमबोध घाटाच्या दिशेने रवाना होईल. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे राष्ट्रीय दुखवटा असल्या कारणाने राष्ट्रपती भवनात शनिवारी होणार चेंज ऑफ गार्ड सेरेमनी होणार नाही. ही एक सैन्य परंपरा आहे. माजी पंतप्रधानांच्या सन्मनार्थ संपूर्ण देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. या दरम्यान संपूर्ण देशात राष्ट्रध्वज झुकलेला राहील.

Manmohan Singh: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन, वयाच्या ९२व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरूवारी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे देशाच्या अर्थकारणातील सरदार हरपल्याची भावना आहे. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. भारताच्या उदारमतवादी धोरणाचे जनक असलेल्या मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर जगभर हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रकृतीच्या कारणास्तव डॉ. मनमोहन सिंह हे गेल्या काही वर्षांपासून राजकारणापासून दूर होते. १९९१ साली देश आर्थिक संकटाशी सामना करत असताना त्यावेळचे अर्थमंत्री मनमोहन सिंह यांनी देशाची बाजारपेठ जगासाठी खुली केली. त्यांनी खासगीकरण-उदारीकरण आणि जागतिकीकरणाचा मार्ग अवलंबला आणि देशाची अर्थव्यवस्थाही रुळावर आणली होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -