
Nitish Kumar Reddy hits his maiden Test century and receives a standing ovation from the MCG crowd #AUSvIND | #PlayOfTheDay | @nrmainsurance pic.twitter.com/Vbqq5C26gz
— cricket.com.au (@cricketcomau) December 28, 2024
नितीश रेड्डी ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज झाला आहे.त्याने ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बॉर्डर गावसकर कसोटी करंडक स्पर्धेत आतापर्यंत आठ षटकार मारले आहेत. याआधी मायकल वॉनने २००२ - ०३ मध्ये ऑस्ट्रेलियातील ॲशेस मालिकेत आठ षटकार मारले होते. वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने २००९ - १० मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत आठ षटकार मारले आहेत.आणखी एक षटकार मारताच नितीश रेड्डी हा ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत सर्वाधिक षटकार मारणारा अव्वल फलंदाज होणार आहे.

Ind vs Aus : भारत तीनशे पार, फॉलोऑन टळला
मुंबई: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अंतर्गत भारत आणि ऑस्ट्रेलिया(Ind vs Aus )यांच्यातील चौथा कसोटी सामना मेलबर्नच्या क्रिकेट मैदानावर खेळवला जात आहे. आज सामन्याचा ...
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव - सर्वबाद ४७४ धावा
भारताचा पहिला डाव - नऊ बाद ३५८ धावा
यशस्वी जयस्वाल ८२ धावा, रोहित शर्मा ३ धावा, केएल राहुल २४ धावा, विराट कोहली ३६ धावा, आकाश दीप शून्य धावा, रिषभ पंत २८ धावा, रविंद्र जाडेजा १७ धावा, नितीश कुमार रेड्डी नाबाद १०५ धावा, वॉशिंग्टन सुंदर ५० धावा, जसप्रीत बुमराह शून्य धावा, मोहम्मद सिराज नाबाद दोन धावा, अवांतर ११

Vinod Kambli : हृदय पिळवटून टाकणारा विनोद कांबळीचा ताजा व्हिडीओ व्हायरल
ठाणे : निवृत्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू विनोद कांबळी (५२) याच्या मेंदूत रक्ताच्या गुठळ्या झाल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी आले होते. आता विनोदचा एक ...
ऑस्ट्रेलियात पहिले कसोटी शतक झळकावणारे तरुण भारतीय क्रिकेटपटू
- सचिन तेंडुलकर - सिडनी १९९२ - वय : १८ वर्षे २५६ दिवस
- रिषभ पंत - सिडनी २०१९ - वय : २१ वर्षे ९२ दिवस
- नितीश रेड्डी - मेलबर्न २०२४ - वय : २१ वर्षे २१६ दिवस
- दत्तू फडकर - अॅडलेड १९४८ - वय : २२ वर्षे ४६ दिवस
बॉर्डर - गावसकर ट्रॉफी (भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया)
- पहिली कसोटी, पर्थ - भारताचा २९५ धावांनी विजय
- दुसरी कसोटी, अॅडलेड - ऑस्ट्रेलियाचा दहा गडी राखून विजय
- तिसरी कसोटी, ब्रिस्बेन - सामना अनिर्णित
- चौथी कसोटी, मेलबर्न - खेळ सुरू आहे
- पाचवी कसोटी, सिडनी - खेळ ३ जानेवारी २०२५ पासून सुरू होणार