Urmilla Kanetkar Kothare : उर्मिला कानेटकर कोठारेच्या कारला अपघात, अपघातात एकाचा मृत्यू

मुंबई : प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री उर्मिला कानेटकर कोठारेच्या कारला अपघात झाला. या अपघातात एका मजुराचा मृत्यू झाला. एक मजूर जखमी झाला. उर्मिला कानेटकर कोठारे आणि उर्मिलाच्या कारचा चालक जखमी झाले. अपघात कांदिवलीत पोयसर मेट्रो स्टेशन जवळ झाला. कार वेगात होती. मजूर समोर आल्यावर चालकाने कार थांबवण्याचा प्रयत्न केला. पण भरधाव वेगामुळे कारची मजुरांना धडक बसली. अपघात प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.अपघातात उर्मिला कानेटकर कोठारेच्या कारच्या पुढील भागाचे प्रचंड नुकसान झाले आहे. तपास सुरू असल्यामुळे कार सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. समतानगर पोलीस ठाण्यात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.



याआधी शुक्रवारी घाटकोपरच्या चिराग नगर मार्केट परिसरात एक अपघात झाला. रस्त्यावरुन वेगाने जात असलेल्या टेम्पोने सहा जणांना चिरडले. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या अपघातात जखमी झालेल्या लोकांवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.टेम्पो आझाद नगरहून मच्छी मार्केटच्या दिशेने भरधाव वेगात जात होता. यावेळी अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला.



आझाद मसाला शॉप समोर, मच्छी मार्केट रोड, चिराग नगर, घाटकोपर, मुंबई येथे टाटा कंपनीचा छोटा टेम्पो क्रमांक MH 05 EL1951 चा चालक नामे उत्तम बबन खरात, वय २५ वर्ष, हा टेम्पो चालवत असताना स्टेरिंग वरील ताबा सुटल्याने रस्त्याने जाणा-या पादचाऱ्यांना टेम्पोची धडक लागली.



सदर अपघातामध्ये प्रीती रितेश पटेल ही ३५ वर्षीय महिला राहणार भागीरथी चाळ, पारशीवाडी, घाटकोपर पश्चिम यांचा मृत्यू झाला. तर अन्य तीन महिला व एक पुरुष रेश्मा शेख, वय २३ वर्ष, मारूफा शेख वय २७ वर्ष, तोफा उजहर शेख, वय ३८ वर्षे आणि मोहरम अली अब्दूल रहीम शेख वय २८ वर्षे, सर्व जण राहणार चिराग नगर, पारशीवाडी, मच्छी मार्केट, घाटकोपर पश्चिम यांना मुका मार व किरकोळ दुखापती झाल्या असून त्यांना तात्काळ राजावाडी रुग्णालय येथे उपचाराकरीता दाखल केले आहे. काही दिवसांपूर्वी कुर्ला परिसरात एका भरधाव बसने अनेक लोकांना चिरडले होते. यात नऊजणांचा मृत्यू झाला होता तर ३३ जण जखमी झाले होते.



कोण आहे उर्मिला कानेटकर कोठारे ?

उर्मिला कानेटकर कोठारे प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री आहे. उर्मिलाने 'दुनियादारी', 'शुभ मंगल सावधान', 'ती सध्या काय करते ?' सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्रपट निर्माते दिग्दर्शक महेश कोठारे यांचे पुत्र आदिनाथ कोठारे हे उर्मिलाचे पती आहेत.
Comments
Add Comment

मुलुंडमध्ये शत प्रतिशत भाजपा, शिवसेनेच्या वाट्याला जाणार नाही एकही प्रभाग

मुंबई (सचिन धानजी): उत्तर पूर्व अर्थात ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातील मुलुंड विधानसभा मतदार हा संघ भाजपाचा

मुलुंडमध्ये शत प्रतिशत भाजप

युतीमध्ये या विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या वाट्याला जाणार नाही एकही प्रभाग सचिन धानजी मुंबई : उत्तर पूर्व

मॅरेथॉनसाठी मध्य रेल्वेच्या विशेष लोकल

मुंबई  : पश्चिम नौदल कमांड (डब्ल्यूएनसी) नेव्ही हाफ मॅरेथॉननिमित्त मध्य रेल्वेने शनिवारी रात्री विशेष लोकल

गृहनिर्माण धोरणात भाडेतत्त्वावरील घरांना प्राधान्य

म्हाडाच्या विकासकांना १०० टक्के मालमत्ता कर माफ' मुंबई  : मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) ग्रोथ हबअंतर्गत म्हाडाने

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ओरीला ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलिसांनी बजावले समन्स! 'त्या' पार्टीत अनेक बॉलीवूड कलाकारांची हजेरी

मुंबई: मुंबई पोलिसांनी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ओरीला २५२ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात समन्स बजावले आहेत. हे समन्स

मुंबईतील १२ मेट्रो स्थानकांवर स्मार्ट लॉकर सुरू

मुंबई : भारताच्या सार्वजनिक वाहतूक इकोसिस्टमसाठी निर्बाध डिजिटल पेमेंट्स आणि सेवा सक्षम करणाऱ्या ऑटोपे पेमेंट