मुंबई : मध्य रेल्वे, मुंबई विभागात रविवारी (२९) विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करत उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक (Mega block) असणार आहे. सीएसएमटी मुंबई ते विद्याविहार दरम्यान सकाळी १०.५५ ते दुपारी ३.२५ पर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.४८ ते दुपारी ३.१८ पर्यंत सीएसएमटी मुंबई येथून सुटणाऱ्या डाऊन धीम्या सेवा सीएसएमटी मुंबई आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येईल आणि भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकावर थांबेल आणि पुढे विद्याविहारला डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येईल.
सकाळी १०.१९ ते दुपारी ३.१९ पर्यंत घाटकोपर येथून सुटणाऱ्या अप धीम्या सेवा विद्याविहार आणि सीएसएमटी मुंबई स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांदरम्यान थांबेल. सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्ग (पोर्ट लाईन वगळून) हार्बर लाइन ब्लॉक विभाग सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत सीएसएमटीकडे जाणाऱ्या पनवेलकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ पर्यंत रद्द राहतील.
Accident: घाटकोपरमध्ये टेम्पो चालकाने ५ ते ६ जणांना चिरडले, एका महिलेचा मृत्यू
ट्रान्स हार्बर लाईन ब्लॉक विभाग सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत पनवेल येथून ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून पनवेलकडे जाणाऱ्या पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२०पर्यंत रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी मुंबई-वाशी भागावर विशेष लोकल चालतील. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल. ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट लाईन सेवा उपलब्ध असेल. हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना विनंती करण्यात आली आहे की, त्यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे.
पश्चिम रेल्वेवर दिवसा ब्लॉक नाही; २८/२९ च्या मध्यरात्री लोअर परळला मेजर ब्लॉक
शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री म्हणजेच २८/२९ डिसेंबर २०२४ रोजी लोअर परळ स्टेशनवर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग पॅनेल सुरू करण्यासाठी एक मोठा नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक अप आणि डाऊन जलद मार्गांवर २३:३० ते ४:३० तासांपर्यंत ५ तासांसाठी असेल. ब्लॉक कालावधीत, मुंबई सेंट्रल आणि माहीम स्थानकांदरम्यान सर्व जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गावर चालवल्या जातील. ब्लॉकमुळे काही अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द राहतील. या गाड्यांची सविस्तर माहिती उपनगरीय विभागातील सर्व स्थानकांवर उपलब्ध असेल. प्रवाशांना विनंती आहे की, कृपया वरील व्यवस्था लक्षात घेऊन प्रवास करावा. त्यानुसार, पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय विभागात रविवार, २९ डिसेंबर रोजी दिवसाचा ब्लॉक असणार नाही.