Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडीAccident: घाटकोपरमध्ये टेम्पो चालकाने ५ ते ६ जणांना चिरडले, एका महिलेचा मृत्यू

Accident: घाटकोपरमध्ये टेम्पो चालकाने ५ ते ६ जणांना चिरडले, एका महिलेचा मृत्यू

मुंबई: मुंबईच्या कुर्ला परिसरात घडलेल्या बेस्ट बसच्या अपघाताच्या घटनेला काही दिवस होत नाहीतच तोच पुन्हा घाटकोपरमध्ये अपघाताची भयंकर घटना घडली आहे. घाटकोपरच्या चिराग नगर मार्केट परिसरात हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

रस्त्यावरून हा टेम्पो भरधाव वेगात जात होता. या भरधाव टेम्पोने पाच ते सहा जणांना चिरडले. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या अपघातात जखमी झालेल्या लोकांवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

धस यांच्या रडारवर पुन्हा ‘आका’; एकाच व्यक्तीच्या खात्यातून ९०० कोटींचा व्यवहार! दोन पोलीस अधिकारीही गुंतल्याचा आरोप

घाटकोपरच्या या परिसरात हा टेम्पो आझाद नगरहून मच्छी मार्केटच्या दिशेने भरधाव वेगात जात होता. यावेळी पाच ते सहा जणांना चिरडलं. हा गाडीचालक नशेत होता. त्याचे टेम्पोवरील नियंत्रण सुटले आणि त्याने पाच ते सहा जणांना धडक दिली. दरम्यान, प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार या ड्रायव्हरला नागरिकांनी पकडलं असता. पोलीस आल्यानंतर त्यांनी गाडीचालकाला पोलिसांच्या ताब्यात दिलं. हा टेम्पोचा ड्रायव्हर आझादनगर येथून आला होता. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू तर चार जण जखमी झालेत.

आझाद मसाला शॉप समोर, मच्छी मार्केट रोड, चिराग नगर, घाटकोपर, मुंबई येथे टाटा कंपनीचा छोटा टेम्पो क्रमांक MH 05 EL1951 चा चालक नामे उत्तम बबन खरात, वय २५ वर्ष, हा टेम्पो चालवत असताना स्टेरिंग वरील ताबा सुटल्याने रस्त्याने जाणा-या पादचाऱ्यांना टेम्पोची धडक लागली.

सदर अपघातामध्ये प्रीती रितेश पटेल ही ३५ वर्षीय महिला राहणार भागीरथी चाळ, पारशीवाडी, घाटकोपर पश्चिम यांचा मृत्यू झाला. तर अन्य तीन महिला व एक पुरुष रेश्मा शेख, वय २३ वर्ष, मारूफा शेख वय २७ वर्ष, तोफा उजहर शेख, वय ३८ वर्षे आणि मोहरम अली अब्दूल रहीम शेख वय २८ वर्षे, सर्व जण राहणार चिराग नगर, पारशीवाडी, मच्छी मार्केट, घाटकोपर पश्चिम यांना मुका मार व किरकोळ दुखापती झाल्या असून त्यांना तात्काळ राजावाडी रुग्णालय येथे उपचाराकरीता दाखल केले आहे.

कुर्ला दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू

काही दिवसांपूर्वी कुर्ला परिसरात एका भरधाव बसने अनेक लोकांना चिरडले होते. यात ७ जणांचा मृत्यू झाला होता तर ३३ जण जखमी झाले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -