पुणे : आधीच महागाईने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना नव्या वर्षात वाढणाऱ्या खतांच्या किमतीला सामोरे जावे लागणार आहे. हवामान बदलामुळे (Weather Update) शेतकऱ्यांना अगोदरच आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, त्यातच आता वाढणाऱ्या रासायनिक खतांमुळे (Chemical Fertilizers Price Hike) शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडणार आहे. खरीप हंगामात झालेले नुकसान कसे भरून काढावे, हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत असतानाच अचानक रासायनिक खतांचे भाव वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
Alibaug News : अलिबागमध्ये पुढील दोन दिवस अवजड वाहनांना बंदी!
रासायनिक खतांच्या किमती आधीच जास्त असताना खत उत्पादक कंपन्यांनी १ जानेवारी २०२५ पासून दरवाढ जाहीर केली आहे. त्यानुसार रासायनिक खतांच्या किमतीमध्ये २०० ते ३०० रुपयांची वाढ होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त भार सहन करावा लागणार आहे. (Chemical Fertilizers Price Hike)