मुंबई : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षांचं स्वागत करण्यासाठी २५ डिसेंबर ख्रिसमसपासूनच अनेक लोकं सुट्टीवर गेले आहेत. या दिवसांमध्ये शाळांना देखील सुट्टी असते. अशावेळी अनेक कुटुंब बाहेर जाण्याचा प्लान करतात. फॅमिली पिकनिक म्हणून अलिबाग (Alibaug News) हे सर्वाच आवडीचं ठिकाण आहे. पण अलिबाग येथे प्रशासनाने पुढील दोन दिवस जड वाहनांना बंदी (Heavy van Banned) केली आहे.
अलिबागमधील मुरूड तालुक्यात २८ आणि २९ डिसेंबर रोजी अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अलिबागमध्ये सुट्टीसाठी जाणाऱ्या पर्यटकांचा प्रवास आता सुखाचा होणार आहे.’
जड वाहनांमुळे वाहतूक कोंडीची शक्यता
२८ आणि २९ डिसेंबर या दोन्ही दिवशी सुट्ट्या असल्यामुळे अलिबागमध्ये पर्यटकांची संख्या वाढू शकते. त्यांचा प्रवास सुखाचा व्हावा यासाठी अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. अनेकदा जड वाहने रस्त्यांवर असल्यामुळे जास्त ट्रॅफिक जॅमची शक्यता असते. तसेच या वाहनांमुळे अपघात होण्याची देखील दाट शक्यता असते. या सगळ्याचा विचार करतो हा निर्णय घेण्यात आला आहे.