मुंबई : सलमान खानचा (Salman Khan) आज २७ डिसेंबर रोजी ५९ वा वाढदिवस आहे. सलमानच्या वाढदिवसानिमित्त त्याचे जगभरातील करोडो चाहते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. अशातच सलमान खानच्या आगामी ‘सिकंदर’ सिनेमाचा टीझर आज त्याच्या वाढदिवशी रिलीज होणार होता. पण काल भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (Dr. Manmohan Singh) यांचं निधन झाल्याने टीझर रिलीजबाबत निर्मात्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
सलमान खानच्या वाढदिवसानिमित्त म्हणजेच आज सलमानचा आगामी ‘सिकंदर’ सिनेमाचा टीझर रिलीज होणार होता. परंतु काल डॉ.मनमोहन सिंग यांचं निधन झाल्याने निर्मात्यांनी टीझर रिलीजची डेट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आज ११ वाजता रिलीज होणारा ‘सिकंदर’चा टीझर आता उद्या सकाळी ११ वाजून ७ मिनिटांनी रिलीज होणार आहे. त्यामुळे सलमानच्या चाहत्यांना आणखी काही तास ‘सिकंदर’चा टीझरसाठी वाट पाहावी लागणार आहे.
सलमान खानचा बहुप्रतिक्षित ‘सिकंदर’ सिनेमा पुढील वर्षी ईदच्या मुहुर्तावर रिलीज होणार आहे.या सिनेमाचे दिग्दर्शन ‘गजनी’ फेम ए.आर. मुरुगदास यांनी केली आहे.तर या सिनेमाची निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली आहे. ‘किक’नंतर अनेक वर्षांनी सलमान आणि साजिद एकत्र काम करत आहेत. यावेळी त्याच्यासोबत दक्षिणेतील प्रसिद्ध दिग्दर्शकच नाही तर पुष्पाची अभिनेत्री रश्मिका मंदान्नाही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पहिल्यांदाच त्यांची जोडी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सलमानचे चाहते सिनेमासाठी प्रचंड उत्सुक आहेत.
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…
अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…